मासे खाण्यात हे राज्य सर्वात पटाईत, तर या राज्यात सर्वात कमी मासे खाणारे लोक, पाहा कोणती राज्ये ?

भारताला मोठा समुद्र किनारा असल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या काही वर्षांत मासे खाणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खाऱ्या पाण्यातील मासे खाणारे जसे आहेत. तसेच गोड्या पाण्यातील माशांच्या विविध प्रकारांवर प्रेम करणारे देखील तेवढेच किंवा त्याहून जास्त आहेत. पाहा ही आकडेवारी सर्व सांगते.

मासे खाण्यात हे राज्य सर्वात पटाईत, तर या राज्यात सर्वात कमी मासे खाणारे लोक, पाहा कोणती राज्ये ?
fish dishesImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 6:42 PM

भारतात मासे खाणाऱ्या खवय्यांची संख्या मोठी आहे. देशातील मासे पैदास देखील मोठ्या संख्येने होत आहे. माशांच्या खपाच्या बाबतीत भारताचा समावेश त्या देशात आहे जेथे मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले जातात. इंडियन काऊन्सिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च ( आयसीआर ), मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर एंड फार्मर्स वेल्फेअर आणि वर्ल्ड फिश इंडियाने केलेल्या अभ्यासातून मासे खाणाऱ्यांची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही वर्षात देशांत मासे खाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

भारतात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण कसे वाढले याची आकडेवारी समोर आली आहे. अभ्यासकांनी साल 2005-06 ते 2019-21 पर्यंत म्हणजे 15 वर्षांत माशांच्या झालेल्या विक्रीच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. या आकड्यांनूसार भारतात मासे खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात मासे खाणाऱ्यांची संख्या 730.6 ( 66 टक्के ) दशलक्ष ( 73.06 कोटी ) वरुन 966 दशलक्ष ( 96.6 कोटी ) इतकी झाली आहे. साल 2019-20 मध्ये रोज मच्छी खाणाऱ्यांची संख्या 5.96 टक्के आहे. दर आठवड्यातून एकदा मासे खाणारे 34.8 टक्के आहेत. तर 31.35 टक्के अधूनमधून केव्हातरी मासे खाणारे आहेत. तर देशात सर्वाधिक त्रिपुरा राज्यात 99.35 टक्के लोक मासे खातात. तर हरियाणा येथे सर्वात कमी 20.55 टक्के लोक महिन्यातून कधी तरी मासे खातात. त्रिपूरात सर्वाधिक मासळी खाल्ली जाते त्यानंतर मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मच्छी खाल्ली जात असल्याचे अभ्यासात आढळले आहे.

केरळ आणि गोव्यात सर्वाधिक मस्त्यप्रेमी

भारतातील पूर्वोत्तर आणि उत्तर पूर्वी राज्यांसह तामिळनाडू, केरल आणि गोवा राज्यात सर्वाधिक मासे आवडीने खाल्ले जातात. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यात सर्वात कमी मासे खाल्ले जातात. तर जम्मू आणि काश्मीर येथे मात्र माशांचा खप वाढत आहे. गेल्या 15 वर्षांत काश्मीरातील 20.9 टक्के मासे खाणारे वाढले आहेत. दररोज मासे खाणाऱ्यांमध्ये केरळ आणि गोवा सर्वात पुढे आहेत.

महिलांपेक्षा पुरुष जास्त मस्त्यप्रेमी

मासे खाण्यामध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. 2019-21 च्या आकडेवारीची तुलना करता 78.6 टक्के पुरुष तर 65.6 टक्के महिला मासे खातात. तर आठवड्यातून एकदा मासे खाणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागापेक्षा शहरात जास्त आहे. माशांचा खप जरी वाढला असला तर देशात अन्य मासांहारी अन्न पदार्थांच्या ( चिकन आणि अंडी ) तुलनेत मासे खाणारे तसे अजूनही कमी आहेत.

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.