जम्मू-काश्मीर: शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत चार दहशतवादी ठार

| Updated on: Mar 22, 2021 | 10:42 AM

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाने सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. (Four LeT militants killed, soldier injured in Shopian gunfight)

जम्मू-काश्मीर: शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत चार दहशतवादी ठार
Jammu Kashmir
Follow us on

शोपियां: जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाने सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये प्रचंड चकमक उडाली. यावेळी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून मारण्यात आलेले अतिरेकी लश्कर ए तोयबाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. (Four LeT militants killed, soldier injured in Shopian gunfight)

या अतिरेक्यांकडे एक एके47 आणि दोन पिस्तुल सापडल्या होत्या. यापूर्वी शोपियां जिल्ह्याच्या रावळपोरा येथे तीन दिवसांपासून चकमक उडाली होती. त्यात एक अतिरेकी मारला गेला. या चकमकीत दहशतवादी विलायत हुसैन ऊर्फ सज्जाद अफगानी याला तीन दिवसानंतर मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं. अफगाणी हा रावळपोरा येथील राहणारा होता. तो 2018मध्ये तो दहशतवादी बनला होता. लश्कर ए तोयबाने या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र त्याने नंतर लश्कर हे तोयबाला सोडलं होतं. त्यानंतर तो जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेत सामील झाला होता.

जैशच्या अफगानीचा खात्मा

विलायत ऊर्फ सज्जाद अफगानी हा ए प्लस कॅटेगिरीचा कमांडर होता. बऱ्याच महिन्यांपासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सक्रिय असल्याने सुरक्षा दलाची त्याच्यावर नजर होती. 2018 नंतर पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेसाठी कॅडर आणि लॉजिस्टिक सपोर्ट करण्यातही तो आघाडीवर होता. तो जैशचा डिस्ट्रिक्ट कमांडटही होता. जैशसाठी नव्या अतिरेक्यांची भरती करण्याच्या मुख्य कॅडरमध्येही तो सामिल होता.

पहिल्याच दिवशी चकमक, एक अतिरेकी ठार

2018नंतर शोपियांमध्ये बऱ्याच काळापासून तो लपूनही बसला होता. त्यामुळे त्याला मारणं हे सुरक्षा दलाचं मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. तर जैशसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी शनिवारी शोपियांच्या रावळपोरा येथे 20 तास कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन सुरू होतं. त्यानंतर अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. चकमकीच्या पहिल्याच दिवशी सुरक्षा दलाने एका अतिरेक्याला कंठस्नान घातलं होतं. जहांगीर अहमद वानी असं या अतिरेक्याचं नाव होतं. तो शोपियांचा रहिवासी होता. (Four LeT militants killed, soldier injured in Shopian gunfight)

 

संबंधित बातम्या:

अशी ही बनवाबनवी! मोदी सरकारच्या जाहिरातील घर मिळालेली महिला प्रत्यक्षात राहते झोपडीत

 भाजपचं ‘संकल्प पत्र’ जाहीर, ‘सोनार बांग्ला’ बनवण्याचं वचन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

(Four LeT militants killed, soldier injured in Shopian gunfight)