India-France Rafale Deal : अखेर राफेल फायटर जेट्स बद्दल फ्रान्सकडून भारताची मोठी मागणी मान्य, इंडियन एअर फोर्सला जे हवं होतं ते झालं
India-France Rafale Deal : सध्या भारताकडे जी फायटर जेट्स आहेत, त्यात राफेल 4.5 जनरेशनचं सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. या विमानाबद्दल फ्रान्सने भारताची मोठी मागणी मान्य केली आहे. भारताचा यामध्ये काय फायदा आहे, समजून घ्या.

इंडियन एअर फोर्ससाठी एक चांगली बातमी आहे. फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एविएशनने राफेल फायटर जेट्समध्ये स्वदेशी बनावटीची भारतीय शस्त्र आणि प्रणाली बसवण्यासाठी परवानगी दिली आहे. भारतासाठी ही एक महत्वपूर्ण बाब आहे. कारण राफेलमध्ये भारतीय शस्त्रास्त्र फिट करण्यासाठी भारत बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होता. अखेर फ्रान्सच्या डसॉल्ट एविएशनने ही परवानगी दिली आहे. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनुसार अस्त्र मार्क-1 आणि मार्क-2 बीवीआर मिसाइल, स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपन, रुद्रम अँटी रेडिएशन मिसाइल आणि DRDO ने विकसित केलेली अन्य शस्त्रास्त्र , इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट राफेल प्लॅटफॉर्मवर बसवता येईल. याआधी सोर्स कोड संबंधीच्या चिंतांमुळे ही मागणी प्रलंबित होती.
या परवानगीमुळे भारताचं मीटियोर आणि स्कॅलप सारख्या महागड्या फ्रान्सच्या मिसाइलवरील अवलंबित्व कमी होईल. इंडियन एअर फोर्सला भारतीय शस्त्र, सिस्टिम वापरण्याचं स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे खर्च कमी होईल आणि आत्मनिर्भरता वाढेल. फ्रान्सकडून नवीन 114 राफेल फायटर जेट्स खरेदीचा सौदा 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे. हा करार विद्यमान आर्थिक वर्ष मार्च 2027 किंवा 2026 च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. चर्चेमध्ये किंमत, 50 ते 60 टक्के मेक इन इंडिया साहित्य, टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि भारतात MRO सुविधा स्थापित करणं यावर विस्ताराने चर्चा सुरु आहे.
भारत फ्रान्सकडून अजून किती फायटर जेट्स विकत घेणार?
हा करार प्रत्यक्षात आल्यास काही विमानं फ्रान्सकडून येतील. त्यानंतर मोठ्या संख्येने या विमानांचं उत्पादन भारतात होईल. डसॉल्ट भारतीय भागीदारासोबत मिळून उत्पादन लाइन स्थापित करेल. इंडियन एअर फोर्सकडे 36 राफेल फायटर जेट्स आहेत. 2020-22 दरम्यान भारताला ही विमानं मिळाली आहेत. एप्रिल 2025 मध्ये भारतीय नौदलासाठी 26 मरीन राफेल जेट्स मंजूर झाले आहेत. ही फायटर विमान आयएनएस विक्रांतवर तैनात होतील. हा सौदा 7.4 अब्ज डॉलरचा आहे. त्याशिवाय नवीन 114 राफेल फायटर जेट्स प्रस्तावित आहेत.
चीन-पाकिस्तानचा एकाचवेळी सामना करण्यासाठी किती स्क्वाड्रान्स हवीत?
इंडियन एअर फोर्समधून मिग-21 ची सर्व स्कावड्रान्स पूर्णपणे निवृत्त झाली आहेत. त्यामुळे मंजूर स्क्वाड्रान्सची संख्या 42 असताना ही संख्या घटून 29 वर आलीय. पाकिस्तान आणि चीन यांचा एकाचवेळी सामना करण्यासाठी 42 स्क्वाड्रन्स आवश्यक आहेत. त्या शिवाय भारताचा पाचव्या पिढीचा AMCA फायटर जेट्सचा प्रकल्प सुरु आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअर फोर्सने राफेल फायटर विमानांचा वापर केला होता. इंडियन एअर फोर्सला फ्रान्सची फायटर जेट्स वापरण्याचा अनुभव आहे. आपल्याकडे मिराज फायटर विमानं आहेत.
Web Story
France dassault agrees to integrate indian weapons system on rafale
Summry
India Frontline fighter jets rafale now integrate Indian weapon system with advance bvr astra mark 1 mark 2 missiles rudram anti radiation missile France Dassault aviation allowed
