Operation Sindoor : कारगिल युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या शस्त्रांमध्ये किती फरक? त्यावेळी आपण कुठे होतो? आज कुठे आहोत?
Operation Sindoor : कारगिल युद्धाला आता 26 वर्ष लोटली आहेत. कारगिल युद्धानंतर पाकिस्तान विरुद्ध मोठी लढाई दोन महिन्यांपूर्वी 2025 मध्ये झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यााचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. कारगिलच्यावेळी ज्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानला रडवलेलं ती आणि आजची शस्त्र यात किती फरक आहे? त्यावेळी आपण कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? हे समजून घ्या.

कारगिल युद्ध भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि शौर्याचा गौरवपूर्ण अध्याय आहे. मे 1999 ते जुलै 1999 असं दोन महिने कारगिल युद्ध चाललं. पाकिस्तानने भारतावर हे युद्ध लादलं होतं. कारगिलच्या उंच शिखरांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने पराक्रमाचा नवा अध्याय लिहित या पाकिस्तानी घुसखोरांना तिथून पिटाळून लावलं. या युद्धात काही शस्त्रांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज आपण त्या शस्त्रांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सोबतच आजची शस्त्र त्यावेळच्या शस्त्रांपेक्षा किती वेगळी आहेत, हे सुद्धा पाहणार आहोत. कारगिल युद्धात भारताने विभिन्न प्रकारची शस्त्र...
