हमारी मांगे पुरी करो… नांदवायला नकार देणाऱ्या नवरोबा विरोधात पत्नीने दंड थोपटले
एक तरूणी तिच्या स्कूटीवर बसून प्रियकराच्या घरी पोहोचली आणि त्याच्या घरासमोरच ठिय्या देऊन तिने आंदोलन सुरू केले.

धनबाद : प्यार मे कुछ सही गलत नही होता.. प्रेमात माणूस काहीही करू शकतं. असाच अजब प्रेमाचा गजब मामला सध्या समोर आला आहे. एका तरूणीच्या तिच्या प्रियकराच्या घरासमोरील हाय व्होल्टेज ड्रामामुळे सगळेच अवाक् झाले. झारखंडमधील धनबादमध्ये हा प्रकार घडला आहे. वासेपूर करीमगंजमध्ये राहणारी कशिश ही मुलगी अचानक तिच्या स्कूटीवर बसून प्रियकराच्या घराबाहेर पोहोचली आणि आंदोलन करायलाच बसली.
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी असलेला रोहित राय उर्फ विकी, हा सध्या धनबाद जिल्ह्यातील बरवड्डा पोलीस स्टेशन हद्दीतील यादवपूर येथे आपल्या मामाच्या घरी राहतो. 3 वर्षांपूर्वी कशिश व रोहित रायची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली व ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात
दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांनी एकमेकांच्या धर्माची पर्वा केली नाही. कशिशने रोहितशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. लग्नानंतर तीन वर्षांपर्यंत ते दोघेही पती- पत्नी म्हणून गुमला जिल्ह्यात राहत होते. रोहित हा बजाज फायनान्स कंपनीत काम करत होता.
सासरच्यांनी सुनेला घराबाहेर काढले
प्रेमात फसवणूक झाल्याने न्यायाची मागणी करत कशीश ही स्कूटीवरून तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली. मात्र ती घरी आल्याचे पाहताच रोहित उर्फ विकी घरात जाऊन लपला. त्यानंतर कशिशने सासरच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करताच तिला घराबाहेर काढण्यात आले. कशिशच्या सांगण्यानुसार, रोहितचा लहान भाऊ आणि त्याची आई यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.
ही बाब समोर आल्यानंतर यादवपूर येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, मुलगी एका विशिष्ट समाजाची आहे आणि मुलगा हिंदू असल्याने मुलाच्या कुटुंबीयांना त्यांचे नाते मान्य नाही. मात्र कशिश हिला तिच्या प्रियकरासोबतच रहायचे आहे, त्यावर ती ठाम आहे. या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात कोणत्याही बाजूने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सध्या या विचित्र प्रेमकथेची बाब संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
