बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिला, गर्लफ्रेंड दारात वरात घेऊन पोहोचली; थेट म्हणाली…..
बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्यानंतर गर्लफ्रेंड भडकली. त्यानंतर गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडच्या दारात वरात घेऊन पोहोचली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

तुम्ही भारतातील अनेक लव्हस्टोरी ऐकल्या असतील. अनेक प्रेमीयुगुलाने पळून जाऊन देखील लग्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. गर्लफ्रेंडने लग्न करावं, यासाठी बॉयफ्रेंडने अनेक याचना केल्याच्या देखील घटना आहेत. परंतु उत्तर प्रदेशातून अजबच प्रकार समोर आला. बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्यानंतर गर्लफ्रेंड थेट वरात घेऊन दारात पोहोचली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेशच्या देहरादूनमधील ही घटना आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचल्याने परिसरात एकच राडा झाला. वादानंतर संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं. पोलिसंनी गुरुवारी रात्री दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दोघांमध्ये कोणतीही तडजोड झाली नाही. त्यानंतर दोघांना घरी पाठवलं. गुरूवारच्या दिवशी तरुणीने तरुणाच्या विरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नव्हती. त्यानंतर घाईघाईने तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न एका दुसऱ्या तरुणीसोबत ठरवलं. त्यानंतर हे लग्न थांबवण्यासाठी तरुणीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अनेक वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात मागणी केली. या तरुणीने एक व्हिडिओ देखील व्हायरल केला. पुढे तरुणीने मदत मिळाली नाही, टोकाचा निर्णय घेण्याची धमकी पोलिसांना दिली.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत तरुणीने सांगितलं की, ती देहारादूनची रहिवासी आहे. सात वर्षांआधी दिल्लीत मर्चंट नेव्हीत असलेला तरुण देहादून परिसरात यायचा. तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2018 साली दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे 2019 साली तो तरुण तिला गावी घेऊन गेला. त्यावेळी तरुणी ही 16 वर्षांची होती. आता या तरुणीने या तरुणावर गंभीर आरोप केला. लग्न करण्याचं वचन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला. तरुणीने आरोप केला की, लग्नाविषयी विचारल्यानंतर तरुणी काही ना काही कारण देऊन पुढे ढकलत होता. त्याच काळात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत राहिला.
काही दिवसांपूर्वी त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीशी ठरलं. त्यानंतर ही तरुणी तिची बहीण, कुटुंबीयांसोबत थेट तिच्या गावी गेली. त्यानंतर तरुणीने पोलीस स्टेशनला जाऊन आरोप केला की, तरुणाच्या कुटुबीयांनी चुकीची वागणूक दिली. त्यानंतर घरात हाकलून दिले. तरुणीने नंतर पोलीस स्टेशन गाठलं. तिने पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. एकीकडे आता तरुण हा दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत व्यग्र आहे. त्याची शनिवारी वरात निघणार आहे.