मेहबूबा गाण्यावर करत होती डान्स, आगीत रशियन डांन्सरचा मृत्यू? गोव्याच्या क्लबमध्ये काय घडलं?

Goa Nightclub Fire : गोव्यातील नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेपूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये एक रशियन डांन्सर मेहबूबा-मेहबूबा गाण्यावर नाचताना दिसत आहे. ती जिवंत आहे की मृत्युमुखी पडली याबाबत माहिती समोर आली आहे.

मेहबूबा गाण्यावर करत होती डान्स, आगीत रशियन डांन्सरचा मृत्यू? गोव्याच्या क्लबमध्ये काय घडलं?
Russian Dancer
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 6:50 PM

धक्कादायक घटनेने गोवा हादरलं आहे. नाईटक्लबमध्ये काल रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक रशियन डांन्सर मेहबूबा-मेहबूबा गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याचवेळी क्लबमध्ये आग लागल्याचे दिसत आहे. एका परदेशी नेटकऱ्याने या नाईटक्लबचा एक भयानक व्हिडिओ शेअर केला आहे. यात डांन्सर नाचत असताना लोक मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर आगीचे लोट समोर येताना दिसत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. आता या रशियन डान्सरचे काय झाले? ती जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रशियन डांन्सर मेहबूबा-मेहबूबा या हिंदी गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यामुळे लोक आता तिच्याबद्दल सोशल मीडियावर विचारणा करत आहेत. कारण ती डान्स करत असताना छतावर आग लागल्याचे दिसत आहे. यावंतर काही सेकंदातच संपूर्ण हॉलमध्ये धुर पसरतो. यात या डांन्सरसह अनेक लोक अडकतात. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाईटक्लबमधील कर्मचाऱ्यांसह 4 पर्यटकांचाही समावेश आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांमध्ये या डांन्सरचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डांन्सरचा मृत्यू झाला की ती वाचली?

गोव्यातील या घटनेत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणीही केली. मृतांमध्ये बहुतेक लोक हे किचनमधील कर्मचारी होते, ज्यात तीन महिलांचा समावेश होता, तसेच 3-4 पर्यटकांचाही यात मृत्यू झाला आहे. मात्र आता या रशियन डांन्सरचा जीव वाचला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नाईटक्लबमध्ये ही डांन्सर नाचत आहे. त्याच वेळी छतावरून आगीचे पोळ खाली पडू लागतात. याची कल्पना स्टेजवरील ड्रमरला येते आणि तो तिला बाहेर जाण्यास सांगतो. मात्र त्यानंतर आग धोकादायक रूप धारण करते. मात्र यात या डांन्सरचा जीव वाचला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आतमध्ये अडकलेल्या लोकांना आगमीमुळे आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असल्याचे समोर आले आहे. आता पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. आता गोवा पोलीसांनी नाईटक्लब मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.