Goa Nightclub: गोवा नाईटक्लब आग; घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर
Goa Nightclub Fire Updates: गोव्यातील अरपोरा येथील नाईट क्लबमध्ये सिलेंडर स्फोट झाला. या भीषण आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओत मैफिल रंगलेली असताना आगीची ठिणगी पडलेली दिसते. काय आहे या Viral Video मध्ये

Goa Nightclub Fire: उत्तर गोवातील अरपोरा गावात शनिवारी 6-7 डिसेंबर रोजी रात्री अत्यंत भीष स्फोट झाला. नाईटक्लबमध्ये हा स्फोट झाला. या संबंधी अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आलेली आहे. समाज माध्यमांवर याविषयीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. अग्निशमन दल जेव्हा घटनास्थळी पोहचले. तेव्हा तिथे मृतदेहांचा खच पडलेला दिसला. आगीने हा नाईटक्लब स्मशनात रुपांतरीत झाला. नाईटक्लबमधील आगीने अवघ्या काही क्षणात रौद्ररुप धारण केले. या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही पर्यटक आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. या व्हिडिओत ही आग कशी लागली आणि कशी झपाट्याने पसरली हे दिसत आहे. हा क्लब धुराने भरून गेल्याचे आणि सायरन वाजण्याचे आवाज येत असल्याचे दिसते.
याप्रकरणी गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी माहिती दिली. प्राथमिक तपासानुसार गॅस सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की ही घटना रात्री 12:04 वाजता घडली. पोलीस, अग्निशमन दल आणि ॲम्ब्युलन्स घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पण तोपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला. या घटनेत 23 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचे कुमार यांनी सांगितले.
🔴 BREAKING | Goa Nightclub Tragedy – 23 Dead
A massive fire broke out at Birch by Romeo Lane in North Goa’s Arpora late Saturday night, killing 23 staff members trapped inside. The blaze is suspected to have started in the kitchen, possibly triggered by a cylinder blast,… pic.twitter.com/cZvgsY0wVW
— Bharathirajan (@bharathircc) December 6, 2025
आग लागल्यानंतरचा व्हिडिओ समोर
वृत्त संस्था ANI ने एक अजून व्हिडिओ समोर आणला आहे. त्यानुसार आग विझल्यानंतरही नाईटक्लबची इमारत जळताना दिसत आहे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे आणि आतील भाग पूर्णपणे काळवंडल्याचे दिसते. या क्लबचे नाव Birch by Romeo Lane असं आहे. हा अनेकांचा आवडता क्लब असल्याचे सांगण्यात येते.
#WATCH | Goa | Aftermath of the fire that broke out at a restaurant in North Goa’s Arpora, claiming the lives of 23 people. pic.twitter.com/v6qleY5WJX
— ANI (@ANI) December 7, 2025
CM प्रमोद सावंत घटनास्थळी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रात्री उशीरा घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. गोव्यातील पर्यटन क्षेत्रासाठी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे सावंत म्हणाले. प्राथमिक तपासणीत या क्लबने सुरक्षा उपायांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या सर्व घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. कारणांचा शोध घेण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या मते या घटनेत एकही पर्यटक दगावला नाही. मृतांमध्ये हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचाच समावेश होता.
