AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याची चमकदार कामगिरी, रोबोटिक्स आणि STEM मध्ये खेळाडू चमकले

गोव्यातील तरुण टेक खेळाडूंनी जागतिक STEM आणि रोबोटिक्स ऑलिंपियाड (WSRO) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेऊन राज्याचे नाव उंचावले. ही प्रतिष्ठित स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडली.

WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याची चमकदार कामगिरी, रोबोटिक्स आणि STEM मध्ये खेळाडू चमकले
Wsro Goa
| Updated on: Oct 06, 2025 | 7:48 PM
Share

अहमदाबाद: गोव्यातील तरुण टेक खेळाडूंनी जागतिक STEM आणि रोबोटिक्स ऑलिंपियाड (WSRO) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेऊन राज्याचे नाव उंचावले. ही प्रतिष्ठित स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी विविध STEM आणि रोबोटिक्स चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. गोव्याच्या संघांनी रोबोटिक्स डिझाइन, प्रोग्रामिंग, ऊर्जा नवोन्मेष आणि वैज्ञानिक संशोधन यासारख्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली.

आयोजक आणि पार्टनर

WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 ही स्पर्धा हॅपीनेस रिझर्व्ह फाउंडेशन, चिरिपाल ग्रुप, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि गुजरात सायन्स सिटी, अहमदाबाद यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. या स्पर्धेचे नेतृत्व WSRO चे संस्थापक विशाल चिरिपाल यांनी केले. या स्पर्धेमुळे देशभरातील तरुण खेळांडूंना ना नवोन्मेषासाठी प्रेरित केले आहे.

गोवा संघांची उल्लेखनीय कामगिरी

वेदांग अनय कामत – सारस्वत विद्यालय, मापुसा

  • प्रथम स्थान – इंडस्ट्री 4.0 चॅलेंज (मार्गदर्शक: अनय कामत)
  • तिसरे स्थान – ड्रोन फ्लाइंग (मार्गदर्शक: अनय कामत)
  • चौथे स्थान – ज्युनियर रोबो रेस (मार्गदर्शक: अनय कामत)
  • तिसरे स्थान – लेगो लाईन फॉलोइंग (मार्गदर्शक: अनय कामत)

श्लोक आर. जुनवटकर – महिला आणि नूतन इंग्लिश हायस्कूल

  • प्रथम स्थान – ज्युनियर रोबो रेस (मार्गदर्शक: महादेव मिशाळ)

भार्गव एम. शिरवंत – महिला आणि नूतन इंग्लिश हायस्कूल

  • ज्यूडीज चॉईस अवार्ड – ज्युनियर रोबो रेस (मार्गदर्शक: महादेव मिशाळ)

निर्भय मनोज तालकर – प्रज्ञा हायस्कूल

  • प्रथम स्थान – ज्युनियर लाईन फॉलोइंग (नॉन-लेगो) (मार्गदर्शक: प्रसाद शंभू गाडेकर)

रोनव चोडणकर आणि एरियाना चोडणकर – शारदा मंदिर स्कूल

  • ज्यूडीज चॉईस अवार्ड – तरुण शास्त्रज्ञ (STEM – ओपन गट) (मार्गदर्शक: डॉ. दीपा चोडणकर)

इयान कॅलिस्टो नुनेस – सेंट बार्थोलोम्यू हायस्कूल

  • ज्यूडीज चॉईस अवार्ड – तरुण शास्त्रज्ञ ऊर्जा – अल्गोरिदम (ओपन स्रोत) (मार्गदर्शक: विन्सेंट पॉल टोस्कानो)

सुरभी – सारस्वत विद्यालय, मापुसा

  • ज्यूडीज चॉईस अवार्ड – इंडस्ट्री 4.0 चॅलेंज (मार्गदर्शक: शुभेश मणेरीकर)

रोबोटिक्स शिक्षणात गोवा आघाडीवर

क्युरियस माइंड्स इन्फोटेनमेंट प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक योगेश केरकर यांनी सर्व विजेते आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, ‘हे तरुण नवोन्मेषक याचा पुरावा आहे, की गोवा वेगाने रोबोटिक्स आणि एसटीईएम शिक्षणाचे केंद्र बनत आहे. त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क हे नाविन्याची भावना प्रतिबिंबित करते.’

गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. सावंत यांनी म्हटले की,’मला आमच्या गोव्यातील विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे ज्यांनी WSRO सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची प्रतिभ दाखवली. हे तरुण भारताच्या तांत्रिक प्रवासाचे भविष्य आहेत आणि आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या भावनेला मूर्त रूप देत आहेत. या तरुणांना गोवा सरकारचा सदैव पाठिंबा असेल.’

क्युरियस माइंड्स इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने WSRO आयोजकांसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या अंतर्गत WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 गोव्यात आयोजित केले जाणार आहे. ही गोव्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे गोवा रोबोटिक्स, एआय आणि एसटीईएमसाठी राष्ट्रीय केंद्र म्हणून बनेल.

WSRO राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 ने तरुण विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. यातील अनेक खेळाडू दुबई येथे होणाऱ्या डब्ल्यूएसआरओ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यामुळे गोव्याचा रोबोटिक्स प्रवास भविष्यात इंजीनियर्स, शास्त्रज्ञ आणि बदल घडवणाऱ्यांना प्रेरणा देत आहे.

संपर्क

क्युरियस माइंड इन्फोटेनमेंट प्रा. लि. ईमेल: info@quriousmind.co.in वेबसाइट: www.quriousmind.co.in

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.