AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरातील पहिली ‘खेळणी जत्रा’, महाराष्ट्रातून प्रदर्शनासाठी काय?

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, औरंगाबाद, अमरावती, पुणे या चार विभागाचे स्टॉल असणार आहे. (The India Toy Fair 2021)

देशभरातील पहिली 'खेळणी जत्रा', महाराष्ट्रातून प्रदर्शनासाठी काय?
भारतीय खेळणी जत्रा
| Updated on: Feb 26, 2021 | 8:54 PM
Share

मुंबई : देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी पहिल्यांदा भारतात ‘भारतीय खेळणी जत्रा 2021’ भरणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान ही जत्रा भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही जत्रा आयोजित केली जाणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ही जत्रा आयोजित केली आहे. (The India Toy Fair 2021)

खेळणी तयार करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना चालना मिळण्यासाठी ही जत्रा आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे उद्धाटन केले जाणार आहे. या खेळणी जत्रेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, औरंगाबाद, अमरावती, पुणे या चार विभागाचे स्टॉल असणार आहे. हे चारही स्टॉल महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या खेळणी जत्रेत पारंपरिक खेळणी प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक खेळणी, विविध आकर्षक प्राणी-पक्षी, कार्टून पात्रांच्या खेळणी, कोडे सोडविण्यासाठीचे खेळ या खेळांचाही समावेश असणार आहे.

Toys of India

महाराष्ट्रातील पारंपारिक खेळणी

या जत्रेत देशातील- परदेशातील नावाजलेल्या व्यक्तींचे विविध चर्चासत्र, संभाषण सुद्धा असणार आहेत. देशभरातील पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घेता येणार आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी यांनी ‘भारतीय खेळणी जत्रा 2021’ यासाठी ऑनलाईन पद्घतीने नोंदणी करावी.

यामध्ये सहभागी होण्यासाठी https://theindiatoyfair.in/ या वेबसाईटवर नोंदणी करावी. यावर General visitor म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. (The India Toy Fair 2021)

संबंधित बातम्या :

रात्री मुंबईत, आज केरळमध्ये; मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूची काँग्रेसला सोडचिठ्ठी; आपमध्ये प्रवेश

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.