National Flag : ‘मी ख्रिश्चन, राष्ट्रध्वजाला सॅल्यूट नाही करणार!’ चक्क सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेची वादग्रस्त भूमिका चर्चेत

सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ध्वजारोहणाबाबत घेतलेली भूमिका वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात, त्यानंतर राज्यात आणि आता अखेर देशभरात पसरलीय. त्यामुळे या शिक्षिकेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

National Flag : 'मी ख्रिश्चन, राष्ट्रध्वजाला सॅल्यूट नाही करणार!' चक्क सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेची वादग्रस्त भूमिका चर्चेत
राष्ट्रीय ध्वज
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 9:23 AM

आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotstav) भारतात दणक्यात साजरा करण्यात आला. घरोघरी तिरंगा (India National Flag) फडकवण्यात आला. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी घडलेल्या एका वादग्रस्त भूमिकेमुळे सरकारी शाळेतील (Government School principal) मुख्याध्यापिकाच चर्चेत आल्या आहेत. सरकारी शाळेत मुख्याध्यापिका असणाऱ्या एका शिक्षिकेनं राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात नकार दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे आपण ख्रिश्चन असल्यानं राष्ट्रध्वजाला सलामी देणार नाही, असं म्हटल्यानं या शिक्षिका चर्चेत आल्या आहेत. शाळेतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी घडलेल्या या प्रकारामुळे चर्चांना उधाण आलंय. 15 ऑगस्ट रोजी या शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला होता. याच वर्षी ही शिक्षिका निवृत्त होत असल्यानं तिच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणानंतर अखेर एक व्हिडीओदेखील शिक्षिकेनं जारी केलाय. या व्हिडीओत सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेल्या या शिक्षिकेने आपली भूमिका स्पष्ट केलीय.

कुठे घडलाय हा प्रकार?

राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करण्यास आणि राष्ट्रध्वज फडकवण्यास नकार देणाऱ्या या शिक्षिकेचं नाव तमिळसेल्वी असं आहे. त्या तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यामध्ये असलेल्या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. या वर्षी त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आला होता.

या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यानतच तमिळसेल्वी यांनी राष्ट्रध्वजाबाबत घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्याध्यापकांनी ध्वजारोहणास नकार दिल्यामुळे शाळेतील सहाय्यक मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी अखेर ध्वजारोहण केलं.

हे सुद्धा वाचा

शिक्षिकेनं काय म्हटलं?

सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ध्वजारोहणाबाबत घेतलेली भूमिका वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात, त्यानंतर राज्यात आणि आता अखेर देशभरात पसरलीय. त्यामुळे या शिक्षिकेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असं या शिक्षिकेनं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पण, मी याकोबा ख्रिश्चन असून आमच्यात फक्त देवालाच सलाम करण्याची पद्धत आहे. म्हणून मी इतर कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करायला सांगितलं, असं तमिळसेल्वी या शिक्षिकेनं म्हटलंय.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.