क्रूर औरंगजेबच्या कबरीसाठी सरकारचा दरवर्षी लाखोंचा खर्च, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
Funding Of Aurangzeb Tomb: औरंगजेबच्या कबरीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाकडून लाखो रुपये दिले जात आहे. त्या कबरीच्या देखभालीसाठी हा पैसा खर्च होत आहे. सन 2021-22 मध्ये 2,55,160 रुपये सन 2022-23 मध्ये 2,00,636 रुपये खर्च करण्यात आले.

Funding Of Aurangzeb Tomb: सध्या छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज, क्रूर शासक औरंगजेब याबद्दल चर्चा होत आहे. औरंगजेबची कबरीचा मुद्दा महाराष्ट्रात अधूनमधून गाजत असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये कबर आहे. आता औरंगजेबच्या कबरीबाबत माहिती अधिकारातून (आरटीआय) धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगजेबरसारख्या क्रूर शासकाच्या कबरीवर सरकार लाखो रुपये दरवर्षी खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी महिन्याला फक्त 250 रुपये दिले जात आहे.
औरंगजेबच्या कबरीसाठी किती रुपये दिले
हिंदू जनजागृती संघटनेनुसार, औरंगजेबच्या कबरीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाकडून लाखो रुपये दिले जात आहे. त्या कबरीच्या देखभालीसाठी हा पैसा खर्च होत आहे. सन 2021-22 मध्ये 2,55,160 रुपये सन 2022-23 मध्ये 2,00,636 रुपये खर्च करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत त्यासाठी 6.50 लाख रुपये खर्च केला आहे. म्हणजेच दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी यांच्या मंदिरांसाठी फक्त 250 रुपये महिन्याला दिले जात आहे.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्न
RTI मधील या माहितीनंतर हिंदू जनजागृती संघटनेकडून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. संघटनेने म्हटले आहे की, औरंगजेबसाठी लाखो रुपये आणि शिवाजी महाराज यांच्या मंदिरांसाठी इतके कमी रुपये? असा भेदभाव का? औरंगजेबच्या कबरीसाठी देण्यात येणारी मदत तत्काळ बंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. सरकारने कबर आणि मंदिरात भेदभाव करु नये, असे म्हटले आहे.
औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता काय? असा खडा सवाल करत त्याची कबर काढण्याची मागणी महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजांकडून करण्यात आली आहे. भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या विधानानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान, औरंगजेबाची कबर आमच्यासाठी हे संरक्षित स्मारक असल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले आहे.
