शिक्षण अवघं सातवीपर्यंत, तरीही अब्जावधींची उलाढाल, राम मंदिरासाठी 11 कोटी देणारा उद्योगपती आहे तरी कोण?

शिक्षण अवघं सातवीपर्यंत, तरीही अब्जावधींची उलाढाल, राम मंदिरासाठी 11 कोटी देणारा उद्योगपती आहे तरी कोण?

राम मंदिरासाठी कोट्यवधी रुपये देणारे व्यापारी गोविंदभाई यांचा जीवनप्रवास अनेक संघर्षानी भरलेला आहे (Govindbhai Dholkia donated 11 Crores for Ayodhya Ram Mandir temple).

चेतन पाटील

|

Jan 15, 2021 | 10:31 PM

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण मदतीचा हात करत आहेत. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत. या व्यापाऱ्याचे नाव गोविंदभाई ढोलकिया असं आहे. राम मंदिरासाठी कोट्यवधी रुपये देणारे व्यापारी गोविंदभाई यांचा जीवनप्रवास अनेक संघर्षानी भरलेला आहे. त्यांचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाविषयी आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहेत (Govindbhai Dholkia donated 11 Crores for Ayodhya Ram Mandir temple).

गोविंदभाई ढोलकिया सध्या गुजरात राज्यातील सुरत शहरात वास्तव्यास आहेत. त्यांचा हिऱ्यांचा व्यापार आहे. त्याचबरोबर श्री रामकृष्ण एक्सपोर्ट कंपनीचे ते मालक आहेत. गोविंदभाई यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध आहे. याशिवाय ते प्रचंड धार्मिक आहेत. विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालंय. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. यामागे त्यांची मेहनत आणि चिकाटी हे दोन प्रमुख कारणं आहेत.

गोविंदभाई यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1947 रोजी गुजरातमधील एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंबिय शेती करायचे. घरात गरिबीचं वातावरण होतं. त्यांनी आई-वडिलांची मेहनत बघितली. त्यांना आई-वडिलांची संघर्षाची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी प्रचंड मेहनत केली. गोविंदभाई यांची इयत्ता सातवीनंतर काही कारणास्तव शाळा सुटली. त्यानंतर ते मोठ्या भावासोबत सूरतला गेले. त्यांनी सूरतमध्ये 1964 साली डायमंड पॉलिश करण्याचं काम सुरु केलं. तिथे त्यांनी अनेक वर्ष मेहनत केली. त्यानंतर 2 मार्च 1970 रोजी त्यांनी आपल्या दोन मित्रांसोबत हिऱ्यांचा कारखाना सुरु केला.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

हिऱ्यांच्या व्यापार चांगल्या प्रकारे सुरु असतानाच त्यांनी 1977 मध्ये श्री रामकृष्ण एक्सपोर्ट नावाचा निर्यातीचा कारभार सुरु केला. आज ही कंपनी जगभरातील ख्यातनाम कंपनींपैकी एक कंपनी आहे. गोविंदभाई यांच्या पत्नीचं देखील जास्त शिक्षण झालेलं नाही. मात्र, त्यादेखील सूरतमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

गोविंदभाई ढोलकिया याआधी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 10 दिवसांचा स्पेशल टूर पॅकेज दिल्याने चर्चेत आले होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कंपनीतील 300 कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसह दहा दिवसांच्या उत्तराखंडच्या ट्रीपला पाठवलं होतं. त्यावेळी गोविंदभाई चर्चेत आले होते (Govindbhai Dholkia donated 11 Crores for Ayodhya Ram Mandir temple).

हेही वाचा : राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें