पोरगी कधीच शारीरिक संबंध ठेवणार नाही…. लग्न सोहळा आटोपताच, वधूपित्याच्या ‘त्या’ 3 अटींनी वऱ्हाडी चक्रावले, सासरी जाण्याऐवजी वधू माहेरीच परतली

| Updated on: Jun 09, 2023 | 10:32 AM

लग्नाचे विधी संपन्न होऊन पाठवणीची वेळ आली असता वधूपित्याने तीन अटी समोर ठेवल्या, ज्या मान्य करण्यास वराने नकार दिला. मात्र त्यानंतर वधू सासरी जाण्याऐवजी तिच्या माहेरीच परत गेली.

पोरगी कधीच शारीरिक संबंध ठेवणार नाही.... लग्न सोहळा आटोपताच, वधूपित्याच्या त्या 3 अटींनी वऱ्हाडी चक्रावले, सासरी जाण्याऐवजी वधू माहेरीच परतली
प्रातनिधीक फोटो
Follow us on

झाशी : शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए.. असं म्हटलं जातात. असाच अनुभव एका युवकाला आला. धूमधडाक्यात लग्न करायला तो गेला खरा, लग्नही लागले, पण वरात वधूला न घेताच परत आली. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात लग्नाशी (marriage) संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विदाईच्या वेळी वधूच्या वडिलांनी वर आणि त्याच्या कुटुंबियांसमोर अशा 3 अटी ठेवल्या, ज्या ऐकून सर्वच हादरले. त्यात एक अट अशी होती की वधू आणि वर यांच्यात कधीही शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत.

खरंतर, झाशी जिल्ह्यातील बरुआसागर पोलीस स्टेशन हद्दीतील सिनौरा येथील रहिवासी असलेल्या मानवेंद्रचे लग्न गुरसारे येथे राहणाऱ्या मुलीसोबत निश्चित झाले होते. 6 जून रोजी वरात निघणार होती. लग्नामुळे मानवेंद्रच्या घरी आनंदाचे वातावरण होते. तो दिवसही आला ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.

नंतर आली पाठवणीची वेळ

वधू तिचे मानलेले वडील व बहिणींसह बारूसागर येथील विवाह मंडपात पोहोचली. ढोलताशांसह मिरवणूक लग्नमंडपातही पोहोचली. औक्षण, वरमाला घालणे, सप्तपदी असे सर्व विधी येथे पार पडले. धूमधडाक्यात लग्न लागे. नंतर पाठवणीची वेळ आली. वरपक्षातील मंडळी त्या तयारीत व्यस्त होती, पण तेव्हाच वधूने सासरी जाण्यास नकार दिला.

वधूपित्याने समोर ठेवल्या तीन अटी

याचे कारण म्हणजे, वधूच्या वडिलांनी वर आणि त्याच्या वडिलांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. यामध्ये पहिली अट होती की वधू-वरामध्ये शारीरिक संबंध असणार नाहीत. दुसरी अट अशी होती की वधूने तिच्या धाकट्या बहिणीला तिच्या सासरच्या घरी नेले पाहिजे.

सासरी जाण्याऐवजी वधू माहेरी परतली

तिसरी अट अशी होती की वधूचे वडील कधीही तिच्या सासरच्या घरी जाऊ शकतील आणि त्यांना कोणी अडवणार नाही. या तीन अटी वराचे वडील आणि वराच्या कानावर आल्यावर त्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नववधूला राग आला आणि ती सासरच्या घरी जाण्याऐवजी गुरसरे येथील माहेरी परत गेली.

लग्न मोडल्यानंतर वर काय म्हणाला

लग्न मोडल्यानंतर वराने हा घटनाक्रम सांगितला. 6 तारखेला लग्न होते. सर्व विधी झाल्यानंतर मुलगी खोलीत गेली. यानंतर तिचे वडील आले आणि त्यांनी तीन अटी ठेवल्या. तिन्ही अटींना नकार दिल्यानंतर वधू वडिलांच्या घरी परत गेली.