AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमधील कोव्हिड केअर सेंटरला भीषण आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू

पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. (Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire)

गुजरातमधील कोव्हिड केअर सेंटरला भीषण आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू
Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire
| Updated on: May 01, 2021 | 8:00 AM
Share

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला (Covid-19 Care Centre) भीषण आग  (Fire) लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. सध्या ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. (Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire)

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागली. रात्री 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती 

प्राथमिक माहितीनुसार, शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जखमींवर उपचार सुरु

दरम्यान सध्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मात्र ही घटना नेमकी कधी घडली, आग कशी लागली, याची अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सद्यस्थितीत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire)

संबंधित बातम्या :

आगीच्या घटना वारंवार कशा घडतात ? मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर खडेबोल

Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.