गुजरातमध्ये काँग्रेसचा पर्याय म्हणून ‘आप’कडे जनता?; भाजपची लाट कायम!

गुजरातमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. (Gujarat local body election result : BJP ahead in 20 dist panchayats)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:03 PM, 2 Mar 2021
गुजरातमध्ये काँग्रेसचा पर्याय म्हणून 'आप'कडे जनता?; भाजपची लाट कायम!
आम आदमी पार्टी

अहमदाबाद: गुजरातमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात सर्वाधिक लढत आहे. असं असलं तरी सुरुवातीच्या कलानुसार राज्यात भाजपची लाट कायम असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, या निवडणुकांमध्ये आपला घवघवीत यश मिळताना दिसत असून गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष काँग्रेसला पर्याय ठरताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. (Gujarat local body election result : BJP ahead in 20 dist panchayats)

गुजरातमध्ये 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 तालुका पंचायत समितींसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं होतं. नगरपालिकांसाठी 54.95 टक्के, जिल्हा परिषदांसाठी 62.41 टक्के आणि तालुका पंचायत समित्यांसाठी 63.42 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत बीजेपीने 8,161, काँग्रेसने 7,778 आणि आम आदमी पार्टी (AAP)ने 2,090 उमेदवार उभे केले होते.

भाजपने गड राखले

भाजपने या निवडणुकांमध्ये गेल्या 30 वर्षांपासूनच आपले गड राखले आहेत. राजकोटमध्ये तालुका पंचायतीत भाजपने आतपार्यंत 18 तर काँग्रेसने 14 जागा जिंकल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यांनाही सुरुंग लावला आहे.

आपची घोडदौड

एककीडे या निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड सुरू असतानाच आपनेही हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत आपने जिल्हा परिषदेच्या 6, पंचायत समितीच्या 18 आमि नगरपालिकेच्या 22 अशा एकूण 46 जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे आप नगरपालिकेत 22 आणि तालुका पंचायतीच्या 18 जागांवर आघाडीवर आहे.

आपमुळे काँग्रेसला मोठं नुकसान

या निवडणुकीच्या निकालावरून आपमुळे काँग्रेसला मोठं नुकसान होताना दिसत आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. साबरकांठा येथे काँग्रेस आमदार अश्विन कोटवाल यांचा मुलगा यश कोटवाल पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झाला आहे. राज्यात 31 जिल्हा परिषदांमध्ये भाजप 20 ठिकाणी आघाडीवर आहे. आपमुळे काँग्रेसची सर्व राजकीय गणितं बिघडल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (Gujarat local body election result : BJP ahead in 20 dist panchayats)

 

संबंधित बातम्या:

प्रशांत किशोर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार; एक रुपया पगार घेऊन देणार सल्ला

 लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!

… आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी व्यासपीठावरून निघून गेले; बंगालमध्ये बनते बनते बिगड गयी बात!

(Gujarat local body election result : BJP ahead in 20 dist panchayats)