AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी व्यासपीठावरून निघून गेले; बंगालमध्ये बनते बनते बिगड गयी बात!

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंटने (आयएसएफ) यांनी तयार केलेल्या संयुक्त आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. (West Bengal Assembly election: Congress-ISF disputes in election rally)

... आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी व्यासपीठावरून निघून गेले; बंगालमध्ये बनते बनते बिगड गयी बात!
संयुक्त मोर्चा सभा, पश्चिम बंगाल
| Updated on: Feb 28, 2021 | 6:33 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंटने (आयएसएफ) यांनी तयार केलेल्या संयुक्त आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ऐन सभेतच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचे भाषण सुरू असतानाच आयएसएफ आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले. त्यामुळे संतप्त चौधरी यांनी मध्येच भाषण सोडून स्टेजवरून खाली उतरण्यास सुरुवात केली. पण डाव्यांनी बराच वेळ मनधरणी केल्यानंतर चौधरी स्टेजवर आले आणि भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे संयुक्त आघाडीची सभा पार पडली. पण आघाडीत काहीच अलबेल नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. (West Bengal Assembly election: Congress-ISF disputes in election rally)

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफच्या संयुक्त आघाडीची पहिली सभा पार पडली. या सभेला सभेला तिन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सभेला अभूतपूर्व गर्दी जमल्याने नेतेही खूश होते. मात्र, सभा संपता संपता या सभेला वादाचं गालबोट लागलंच. काँग्रेस आणि आयएसएफचे वाद चव्हाट्यावर आल्याने सभेचा बेरंग झाला.

जागा वाटपावरून मतभेद

काँग्रेसने आएसएफच्या अब्बास सिद्दिकी यांना 30 जागा देण्याची घोषणा केली आहे. पण सिद्दिकी यांनी काँग्रेसकडून आणखी 12 जागा मागितल्या आहेत. पण काँग्रेस या जागा द्यायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात मतभेद आहेत.

नेमकं काय घडलं?

सभेमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी भाषण द्यायला उभे होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर थोड्यावेळाने सिद्दिकी हे मंचावर उठून उभे राहिले. तेवढ्यात डाव्या पक्षांच्या नेत्यांनी चौधरी यांचं भाषण सुरू असतानाच सिद्दिकी यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेला आलेल्यांचं लक्ष सत्कार सोहळ्याकडे वेधलं गेलं. एकाच मंचावर भाषणही सुरू आणि सत्कार सोहळाही सुरू असल्याचं चित्रं पाहून सभेला आलेले लोकही चक्रावून गेले. तसेच भाषण करताना चौधरी यांचं लक्षही विचलीत होऊ लागलं. त्यामुळे भाषण अर्धवट सोडून चौधरी हे तावातावाने स्टेजच्या खाली उतरले. आता मी एक शब्दही बोलणार नाही. मी इथून निघून जातो, असं त्यांनी सांगताच डाव्या पक्षाच्या नेत्यांची एकच पळापळ उडाली. विमान बसू आणि इतर नेत्यांनी चौधरी यांची मनधरणी सुरू केली. बराच वेळ मनधरणी केल्यानंतर अखेर चौधरींचा राग शांत झाला आणि त्यांनी पुन्हा स्टेजवर जाऊन भाषणास सुरुवात केली.

सिद्दिकी म्हणाले, भीक नको

त्यानंतर अब्बास सिद्दिकी यांनीही भाषणाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात डाव्या नेत्यांची तोंडभरून प्रशंसा केली. मात्र काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. डाव्यापक्षांसोबत आमचं जागा वाटप झालं आहे. परंतु आम्हाला आमचा अधिकार हवा आहे. कुणाकडून आम्हाला भीक नकोय, आम्हाला आमचा अधिकार हवा आहे, असं अब्बास यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेस आणि आयएसएफमधील वाद टोकाचे असल्याचे पुन्हा एकदा उघड झालं आहे. (West Bengal Assembly election: Congress-ISF disputes in election rally)

संबंधित बातम्या:

बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी?, केरळमध्ये भाजपला भोपळा? वाचा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार?

भाजपच्या परिवर्तन यात्रेत रथाची तोडफोड, लॅपटॉप, मोबाईलही गायब; बंगालमध्ये हिंसा भडकली

निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी

(West Bengal Assembly election: Congress-ISF disputes in election rally)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.