बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी?, केरळमध्ये भाजपला भोपळा? वाचा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार?

राज्यात कोणाची सत्ता येणार याविषयीची काही काही भाकितं आखली जात आहेत. (c voter opinion poll west bengal assam)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:34 AM, 28 Feb 2021
बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी?, केरळमध्ये भाजपला भोपळा? वाचा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार?
ममता बॅनर्जी आणि नरेेंद्र मोदी

मुंबई : पश्चिम बंगालसह 4 राज्यं आणि एका केंद्रशाशित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने अर्ज भरणे, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी यासाठीच्या सर्व तारखा जाहीर केल्यामुळे या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झालीये. तर, दुसरीकडे सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी लगबग सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार याविषयीची काही भाकितं आखली जात आहेत. एपीपी न्यूज आणि सी-वोटर या संस्थांनी ओपिनियन पोलच्या मदतीने वरील राज्यांमध्ये कोणत्या पक्षांची सत्ता येणार हे जाणूण घेण्याचा प्रयत्न केला आहे. (c voter opinion poll of west bengal and assam and other four state constituency elections)

एबीपी आणि सी-वोटर या संस्थांनी जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जनेतने दिलेल्या उत्तरांनुसार कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते, याचा अंदाज या संस्थांनी बांधला आहे. त्यामुळे जाणून घेऊयात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पदुच्चेरी, आसाम, केरळ या राज्यांमध्ये कोणाची सत्ता येण्याची शक्यता आहे.

पुदुच्चेरीमध्ये एनडीएची सत्ता

एबीपी आणि सी-वोटरने घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार एकूण 30 विधानसभेच्या जागा असणाऱ्या पुदुच्चेरी या केंद्रशाशित प्रदेशात भाजप पुरस्कृत एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे. एनडीएला 46 टक्के मतं मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांना 36 टक्के मतं मिळू शकतात. ओपिनियन पोलनुसार एनडीला 17 ते 21 जागा तर काँग्रेस आणि महायुतीला 8 ते 12 जागा मिळू शकतात.

केरळमध्ये पुन्हा डाव्यांचा बोलबाला

ओपिनियन पोलनुसार केरळमध्ये पुन्हा सीपीआयच्या (एम) नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) ला जवळपास 83-91 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) ला 47 ते 55 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. केरळमध्ये भाजपची परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले जात असून येथे भाजपला फक्त 0 ते 2 जागा मिळू शकतात.

तमिलनाडूमध्ये डिएमकेला संधी

ओपिनियन पोलनुसार तामिलनाडूमध्ये डीएमकेला पंसती मिळत असून एकूण मतांपैकी 41 टक्के मत हे डीएमकेला मिळतील. तर एआयडीएमके व मित्रपक्षांना 29 टक्के मत मिळू शकतात. एआयडीएमके व मित्रपक्षांना 58 ते 66 जागा मिळू शकतात. तर डीएमके आमि मित्रपक्षांना यावेळी सत्तेची चव चाखता येऊ शकते, असं सांगितलं जात आहे. डीएमके आणि मित्रपक्षांना 154 ते 162 जागा मिळू शकतात. अन्य पक्ष आणि अपक्षांना 8 जागा मिळू शकतात.

आसाममध्ये पुन्हा भाजप

ओपिनियन पोलनुसार आसामची जनतेकडून पुन्हा एकदा भाजपला पसंती दिली जात आहे. येथे भाजप आणि मित्रपक्षांना 42 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना एकूण 31 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. स्थानिक पक्ष, अपक्ष यांना 27 टक्के मतं दिली जाऊ शकतात. विधानसभेच्या 126 जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांना 68 ते 76 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 43 ते 51 जागा मिळतील. ओपिनियन पोलनुसार येथे भाजपला संधी मिळण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये कोणाची सत्ता?

विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. मात्र, बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच पसंती दिल्याचे ओपिनयन पोलमधून समोर येत आहे. ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 148-164 जागा मिळू शकतात. तर भाजपला येथे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रस आणि डाव्या आघाडीला 31-39 जागा मिळू शकतात.

दरम्यान, एबीपी आणि सी-वोरट यांच्या ओपिनियन पोलनुसार हे वरील आकडे आहेत. मतदारांचा क,  या राज्यांतली राजकीय वातावरण यावरुन हे प्राथमिक अंदाज बांधण्यात आले आहेत. मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होईल.

इतर बातम्या :

Assembly Election 2021 Date Full scheduled : केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान, निकाल 2 मे रोजी