Gujarat Municipal Election 2021 : गुजरातमधील महापालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व, बडोद्यात सलग चौथ्यांदा झेंडा

बडोदा महापालिकेत भाजपने आतापर्यंत 76 जागांपैकी 45 जागांवर विजय मिळवला आहे. (Gujarat Municipal Election 2021)

Gujarat Municipal Election 2021 : गुजरातमधील महापालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व, बडोद्यात सलग चौथ्यांदा झेंडा
गुजरातमध्ये सहा महापालिकांवर भाजपचा झेंडा
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 3:29 PM

गांधीनगर : गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळवण्यात यश आलं असून काँग्रेसला अद्याप हाफ सेंच्युरीही करता आलेली नाही. अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोदा, जामनगर आणि भावनगर या सहा महानगरपालिकांतील 576 जागांसाठी रविवारी (21 फेब्रुवारी) मतदान घेण्यात आलं होतं. 48.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. (Gujarat Municipal Election 2021 BJP won Vadodara fourth consecutive time)

भाजपची विजयी घोडदौड

मंगळवारी सकाळी नऊ वाजता गुजरातच्या सहा महानगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोदा, जामनगर आणि भावनगर या सहाही महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपची विजयी घोडदौड सुरु होताच अहमदाबादेत कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.

सलग चौथ्यांदा बडोद्यात भाजपचा झेंडा

राजकोट महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून कॉंग्रेसचे राजकोट शहराध्यक्ष अशोक डांगर पराभूत झाले. बडोदा महापालिकेत भाजपने आतापर्यंत 76 जागांपैकी 45 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा बडोद्यात झेंडा फडकवण्यात भाजपला यश आलं आहे. बडोदा महापालिकेत आवश्यक बहुमत 39 असून कॉंग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत.

कोणत्या महापालिकेत किती जागा?

 एकूण जागा (आघाडी/विजयी) भाजप काँग्रेस अन्य
अहमदाबाद – 192 (100) 82 16 2
सुरत – 120 (80) 56 8 16
बडोदा – 76 (35) 27 8 0
राजकोट – 72 (48) 48 0 0
भावनगर – 52 (27) 20 7 0
जामनगर – 64 (32) 23 6 3
एकूण जागा – 576 (322 जागांचे कल) 256 45 21

AIMIM ला मोठा झटका

सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये असदुद्दीने ओवेसी यांच्या AIMIM पक्षाचे 4 उमेदवार आघाडीवर होते. बहरामपूरमधील जागा AIMIM साठी मजबूत मानली जात होती. पण तिथे AIMIM च्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागतोय. इथं काँग्रेसचं पॅनल विजयी ठरलं. त्याचबरोबर दरियापूर इथं स्वत: ओवेसी यांनी प्रचार केला होता. पण इथंही काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तिकडे सूरतमध्ये आम आदमी पक्षाने 9 जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसचं जोरदार टक्कर देत आहे. (Gujarat Municipal Election 2021 BJP won Vadodara fourth consecutive time)

#GujaratLocalBodyPolls | As per initial trends, BJP is leading in Jamjodhpur, Thaltej, Vastrapur, Asarwa, Saijpur, Nava Vadaj & Navrangpura wards, Congress leads in Dariapur & Chandkheda wards and AIMIM is leading in Behrampura; BJP is leading in 58 seats & Congress in 8 seats

— ANI (@ANI) February 23, 2021

संबंधित बातम्या :

गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

(Gujarat Municipal Election 2021 BJP won Vadodara fourth consecutive time)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.