Gujrat CM Resigns : पाटील, मांडवीय, पटेल की जदाफिया? कोण होणार गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री, वाचा सविस्तर

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गुजराजच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच चार नावं घेतली जात आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया यांची नावं चर्चेत आहेत. ही चार नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असली तरी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं प्राबल्य लक्षात घेता पाटीदार समाजातील किंवा या समाजाचा पाठिंबा असलेल्या नेत्याच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gujrat CM Resigns : पाटील, मांडवीय, पटेल की जदाफिया? कोण होणार गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री, वाचा सविस्तर
नितीन पटेल, सी. आर. पाटील, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडविय
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 5:09 PM

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातच्या विकासाची ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा उत्साह, नवी ऊर्जेसह पुढे जावी. हे लक्षात घेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं रुपाणी यावेळी म्हणाले. दरम्यान, आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? असा प्रश्न विचारला जात आहे. (Nitin Patel, Mansukh Mandvi, C.R. Patil, Govardhan Jadafia are in CM Post race)

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गुजराजच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच चार नावं घेतली जात आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया यांची नावं चर्चेत आहेत. ही चार नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असली तरी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं प्राबल्य लक्षात घेता पाटीदार समाजातील किंवा या समाजाचा पाठिंबा असलेल्या नेत्याच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीन पटेल

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. नितीन पटेल हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मनसुख मांडविय

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मनसुख मांडविय यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मांडविय या पूर्वी जलमार्ग राज्यमंत्री, रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री राहिलेले आहेत. 2016 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलं होतं. 2012 साली ते पहिल्यांना राज्यसभेवर गेले. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा एकदा राज्यसभेत त्यांची निवड झाली. मांडविय हे सौराष्ट्रातून येतात. भावनगरच्या पलिताना तालुक्यातील एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला आहे. 2002 मध्ये सर्वात कमी वयाचे आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला होता. 2005, 2007 आणि 2019 मधील त्यांची पदयात्रा चर्चेचा विषय ठरली होती.

सी.आर. पाटील

गुजराज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील अर्थात चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. भाजपने गुजराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाटील यांच्या नेृत्वातच लढवल्या होत्या. असं असलं तरी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये किती काळापर्यंत टिकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गोवर्धन जदाफिया

गुजराजमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजून एक नाव घेतलं जात आहे. ते नाव आहे गोवर्धन जदाफिया यांचं. गोवर्धन झडाफिया हे गुजरात भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीवेळी ते राज्याचे गृहराज्यमंत्री होते. तसंच 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जदाफिया यांच्यावर भाजपने उत्तर प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. दरम्यान, जदाफिया हे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक टीकाकार म्हणून ओळखले जात होते. गुजरात दंगलीनंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत आपला वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

इतर बातम्या : 

Gujarat CM Resigns: गुजरातच्या राजकारणात भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

Vijay Rupani Resign : गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? विजय रुपाणींच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?

Nitin Patel, Mansukh Mandvi, C.R. Patil, Govardhan Jadafia are in CM Post race

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.