AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे 70 व्या वर्षात पदार्पण, CM फडणवीसांसह अनेक मान्यवरांची कार्यक्रमाला हजेरी

Sri Sri Ravi Shankar : गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वर्षात पदार्पणानिमित्त आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या 45 वर्षांच्या जागतिक सेवा प्रवासानिमित्त बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये विविध मान्यवरांनी आज हजेरी लावली होती.

गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे 70 व्या वर्षात पदार्पण, CM फडणवीसांसह अनेक मान्यवरांची कार्यक्रमाला हजेरी
gurudev sri sri ravi shankar enters 70th year cm fadnavis and dignitaries attend art of living event Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 15, 2026 | 10:27 PM
Share

बंगळुरू, 15 मे : गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वर्षात पदार्पणानिमित्त आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या 45 वर्षांच्या जागतिक सेवा प्रवासानिमित्त बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये आध्यात्मिक नेते, धोरणकर्ते, कलाकार, उद्योगपती, शिक्षक, खेळाडू आणि सामाजिक परिवर्तनकर्त्यांचा दुर्मिळ संगम पाहायला मिळाला. 1981 मध्ये तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने गुरुदेवांनी सुरू केलेल्या या चळवळीच्या जागतिक प्रभावाचे प्रतिबिंब या महिनाभर चालणाऱ्या सोहळ्यात दिसून आले.

या कार्यक्रमाला देनेंद्र फडणवीस, अशीम कुमार घोष दत्तात्रय होसबळे, पाच वेळा राष्ट्रीय महिला हेवीवेट विजेती नुपूर शेओरन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह अनेक खासदार, मंत्री, कलाकार, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

गुरुदेव हे भारताचे जगातील सर्वात मोठे आध्यात्मिक दूत – CM फडणवीस

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुदेवांचे वर्णन संपूर्ण जगासाठी भारताचे सर्वात मोठे आध्यात्मिक दूत असे केले. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी शक्तीवर आधारित नाही, तर आध्यात्मिक शक्तीवर आधारित आहे. त्या आध्यात्मिक महासत्तेकडे जाणारा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर दाखवत आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गुरुदेवांनी भारताचे आध्यात्मिक विचार, सार्वत्रिक ज्ञान आणि सांस्कृतिक परंपरा संपूर्ण जगासमोर प्रभावीपणे मांडल्या आहेत.

महाराष्ट्रातील सेवा उपक्रमांचे कौतुक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जलसंधारण आणि नैसर्गिक शेती क्षेत्रातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याचे विशेष कौतुक केले. जलसंधारणाच्या कामामुळे अनेकांचे जीवन बदलले. नैसर्गिक शेतीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली, असे त्यांनी सांगितले. तसेच जिथे कुठे आपत्ती किंवा संकट येते, तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक गुरुदेवांचा संदेश घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देताना दिसतात असंही त्यांनी म्हटलं.

182 देशांमध्ये प्रकाश पसरवणारा दिवा

अशीम कुमार घोष यांनी गुरुदेवांच्या जागतिक प्रभावाचे वर्णन करताना सांगितले की, ’45 वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये गुरुदेवांनी जागरूकता आणि करुणेचा दिवा प्रज्वलित केला. आज तो दिवा 182 हून अधिक देशांमध्ये प्रकाश पसरवत आहे आणि एक अब्जांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करत आहे. गुरुदेवांनी जगाला केवळ ज्ञान दिले नाही, तर तणावाचे शांततेत, संघर्षाचे करुणेत आणि निराशेचे आशा व भक्तीत रूपांतर करणारा आध्यात्मिक मार्ग दिला.’

ध्यान मंदिरात विशेष सत्संग

मान्यवरांनी नव्याने उद्घाटन झालेल्या ध्यान मंदिरात गुरुदेवांसोबत विशेष सत्संग आणि ध्यानसत्रात सहभाग घेतला. या ध्यान मंदिराचे उद्घाटन याच महिन्याच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. याआधी “World Meditates with Gurudev for Global Peace” या कार्यक्रमात 182 देशांतील कोट्यवधी लोकांनी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष सहभाग घेतला. हा जगातील सर्वात मोठ्या सामूहिक ध्यान कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. ध्यान मंदिराच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘आज आर्ट ऑफ लिव्हिंग एका विशाल वटवृक्षासारखे उभे आहे, ज्याच्या हजारो फांद्या जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करत आहेत.’

गुरुदेवांचा आनंद आणि श्रद्धेचा संदेश

सत्संगादरम्यान गुरुदेवांनी ध्यान, आनंद, अंतर्मनातील शांतता आणि जीवनाचा अर्थ यावर भाष्य केले. ‘जीवन हे स्वतःमध्ये एक उत्सव आहे. आयुष्यात मिळालेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वराची कृपा आहे,’ असे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य आणि अध्यात्मिक शक्तीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मन शांत, स्थिर आणि आनंदी झाले की बुद्धी तीक्ष्ण होते, शरीराला बळ मिळते आणि चांगली कर्मे घडतात.’ श्रद्धेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, ‘मन कायम आनंदी ठेवण्याचा मार्ग म्हणजे श्रद्धा. देव आपल्या सोबत आहे आणि आपल्या हिताचे जे काही असेल ते तो नक्कीच देईल.’

नुपूर शेओरनचा अनुभव

भारतीय हेवीवेट बॉक्सिंग विश्वविजेती नुपूर शेओरन यांनी सांगितले, ‘मी 2024 मध्ये सुदर्शन क्रिया सुरू केली आणि 2025 मध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन तसेच जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले.’

45 वर्षांचा जागतिक मानवतावादी प्रवास

गेल्या 45 वर्षांत द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवक-आधारित मानवतावादी चळवळींपैकी एक बनली आहे. ध्यान, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, कारागृह सुधारणा, युवक नेतृत्व आणि आपत्ती निवारण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे संस्थेने 182 देशांतील एक अब्जांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?