AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… त्यांनी घर घाण केलं… ज्ञानेश कुमारांच्या आईने गंगाजल शिंपडून केलं शुद्धीकरण

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वडिलोपार्जित घराचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनानंतर शुद्धीकरण करण्यात आले. आई सत्यवती आणि वडील सुबोध कुमार गुप्ता यांनी घरातून अशुद्धी दूर करण्यासाठी हा धार्मिक विधी आयोजित केला. यात गंगाजल शिंपडून, सुंदरकांड पठण करून आणि कलश यात्रा काढून घर पवित्र करण्यात आले.

धक्कादायक... त्यांनी घर घाण केलं... ज्ञानेश कुमारांच्या आईने गंगाजल शिंपडून केलं शुद्धीकरण
CEC home purificationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 2:10 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वडिलोपार्जित घरी मंगळवारी शुद्धीकरणाचा कार्यक्रम करण्यात आला. अखिल भारतीय माथुर वैश्य महासभेने हे शुद्धीकरण केलं. राधाकृष्ण मंदिरापासून महिलांनी पिवळे वस्त्र परिधान करून कलश यात्रा काढली. शंखनाद करत ही यात्रा ज्ञानेश कुमार यांच्या घरापर्यंत आली. यावेळी ज्ञानेश कुमार यांची आई सत्यवती यांनी गंगाजल शिंपडून घराचं शुद्धीकरण केलं. त्यानंतर घरात सुंदरकांडचे पठण झाले. या कार्यक्रमाला शेजारी आणि महासभेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

शुद्धीकरण का करण्यात आलं? त्यामागचं कारण ज्ञानेश कुमार यांची आई सत्यवती यांनी स्पष्ट केलं आहे. 28 सप्टेंबर रोजी काही लोक घरी आले होते. त्यांनी घर घाणं केलं. त्यामुळेच हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला. शांती आणि शुद्ध वातावरणासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं सत्यवती यांनी सांगितलं. घंटानाद करत आणि शंख वाजवून ही कलश यात्रा आली. त्यानंतर आम्ही सुंदरकांडाच्या पुस्तकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पाठ सुरू करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

त्याच ठिकाणी शुद्धीकरण

यावेळी ज्ञानेश कुमार यांचे वडील डॉ. सुबोध कुमार गुप्ता यांनीही प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इतर लोक आले होते. त्यांनी आमच्या घरात घाण केली. त्यामुळे त्याच ठिकाणची स्वच्छता आणि शुद्धीकरणाचा कार्यक्रम केला जात आहे. खोटं ते खोटं आणि खरं ते खरं असावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं सुबोध कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

तर, काही दिवसांपूर्वी आमचं घर अशुद्ध करण्यात आलं होतं. त्यामुळेच शुद्धीकरण कलश यात्रा काढण्यात आली आहे, असं कार्यक्रमाचे संयोजक उपमा गुप्ता यांनी सांगितलं. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश मामा यांच्या मते, घराची शुद्धी शांततेत आणि धार्मिक वातावरणात व्हावी, वृद्ध आईवडिलांचं आरोग्य चांगलं राहावं, घरात सुख नांदावं आणि घरातील लोकांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी आम्ही प्रार्थना केली आहे.

काँग्रेसने काळं फासलेलं

ज्ञानेश कुमार यांच्या वडिलोपार्जित घराला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासून निदर्शने केली होती. स्थानिक कोर्टाने अटक करण्यात आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी जामीन दिला आहे. काँग्रेसचं आंदोलन हे अराजकता असल्याची टीका सुबोध कुमार गुप्ता यांनी केली होती. माझ्या मुलाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हे केलं आहे. पण सत्य सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दिल्लीत आंदोलन

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात इंडिया आघाडीने काल दिल्लीत जोरदार आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जोरदार निदर्शने करत ठिय्या आंदोलन केलं होतं. या आंदोलनात काँग्रेससह, ठाकरे गट, सीपीआय, माकपा, राजद, शरद पवार गट आणि रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीसह एकूण 20 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक