हरियाणातील भाजप सरकार संकटात?, जेजेपीचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?

हरियाणातील भाजप सरकराला पाठिंबा देणाऱ्या जननायक जनता पार्टीचे आमदारांची पक्ष सोडण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे.(Haryana BJP Government)

हरियाणातील भाजप सरकार संकटात?, जेजेपीचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?
मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री हरियाणा

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या अंमलबाजवीणाला स्थगिती देत मोदी सरकारला धक्का दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कृषी कायद्यांमुळे भाजपला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे. हरियाणातील भाजप सरकराला पाठिंबा देणाऱ्या जननायक जनता पार्टीचे आमदारांची पक्ष सोडण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. (Harayana BJP Government will be facing trouble due to farmer protest)

दुष्यंत चौटालांवर आमदारांचा वाढता दबाव

कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. जेजेपीमधील काही नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. यामुळे जेजेपीचे काही आमदारांनी पक्षाची साथ सोडल्यास कोणत्याही क्षणी हरियाणा सरकार कोसळू शकते. हरियाणा विधानसभेत भाजप 40 जागावंर विजयी झाले आहेत तर जेजेपी 10 जागांवर विजयी झाले. सध्या दोन्ही पक्षांचं सरकार सत्तेत आहे. शेतकरी संघटनांच्या विरोधामुळे मनोहरलाल खट्टर यांची कर्नालमध्ये सभा होऊ शकली नव्हती. पक्षातून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दुष्यंत चौटालांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली होती.

अमित शाहंसोबत दीड तास बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मनोहरलाल खट्टर आणि दुष्यं चौटाला यांच्यामध्ये दीड तास बैठक चालली. याबैठकीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, शेतकरी आंदोलन या विषयी चर्चा केली. मनोहरलाल खट्टर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन मनोहरलाल खट्टर यांनी केलं होते.

सुप्रीम कोर्टाकडून 4 सदस्यीय समिती स्थापन

कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 4 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये कृषी अर्थव्यवस्थेचे जाणकार आणि भारत सरकारचे माजी सल्लागार अशोक गुलाटी, भारतीय किसान यूनियनचे एचएस मान, प्रमोद कुमार जोशी आणि अनिल घनवट यांचा समावशे आहे.

हरियाणा विधानसभेतील संख्याबळ

भाजप: 40 काँग्रेस : 31 जेजेपी : 10 भारतील राष्ट्रीय लोकदल : 01 इतर : 08

संबंधित बातम्या:

कृषी कायद्याच्या समीक्षेसाठी समिती, कायद्यावरून वाद-प्रतिवाद; वाचा कोर्टात नेमकं काय घडलं?

…तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, शेतकऱ्यांचा निर्धार कायम

(Harayana BJP Government will be facing trouble due to farmer protest)

Published On - 1:18 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI