AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat : हरियाणा निवडणुकीत विनेश फोगाटचा डाव पडणार भारी? भाजपला देणार का धोबीपछाड?

Haryana Assembly Election 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने शंभु बॉर्डरवर आंदोलक, जींद आणि रोहतक येथील खाप पंचायतीचे पंच, नेत्यांची भेट घेतली. 27 ऑगस्ट रोजी आयोजीत कार्यक्रमात त्यांनी राजकारणात येण्याविषयीचे संकेत दिले. पण असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घेणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

Vinesh Phogat : हरियाणा निवडणुकीत विनेश फोगाटचा डाव पडणार भारी? भाजपला देणार का धोबीपछाड?
हरियाणात विनेश फोगाट मैदानात? बहिणीसोबतच होणार सामना?
| Updated on: Sep 01, 2024 | 11:06 AM
Share

हरियातील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट चौधरी ठरणार का? अशी चर्चा रंगली आहे. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 ची तारीख जवळ आली आहे. शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अनेक मुद्दे गेमचेंजर ठरतील. सध्याच्या सरकारविरोधातील भावना, शेतकरी आणि कुस्तीपटूंचे आंदोलन, सरकारी कर्मचाऱ्यांचा असंतोष आणि जाट समाजाची भूमिका महत्वाची ठरेल.

विनेश फोगाट मैदानात?

पॅरीस ऑलम्पिकमध्ये विनेश फोगाटची कामगिरी सरस ठरली. काही घडामोडींमुळे तिचे एक स्वप्न भंगले. त्यानंतर ती आता हरियाणा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. विनेश फोगाटने यापूर्वी कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. ब्रजभूषण शरण सिंह याच्याविरोधातील तिच्या भूमिकेमुळे एकच काहूर उठले होते. लोकसभा निवडणुकीत पण विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने शंभु बॉर्डरवर आंदोलक, जींद आणि रोहतक येथील खाप पंचायतीचे पंच, नेत्यांची भेट घेतली. 27 ऑगस्ट रोजी आयोजीत कार्यक्रमात त्यांनी राजकारणात येण्याविषयीचे संकेत दिले. पण राजकारणात येण्यापूर्वी आपण समाजातील ज्येष्ठांचा, वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणार असल्याचे तिने सांगितले. माझे मन ज्यावेळी शांत होईल. त्यावेळी याविषयीचा निर्णय घेणार आहे. सध्या आपण धक्क्यातून सावरलो नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

कुटुंबाची राजकीय सक्रियता

विनेश फोगाटचे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. तिची चुलत बहिण बबिता फोगाट हिने 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून दादरी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर विनेश काँग्रेसच्या बाजूला झुकलेली दिसत आहे. या दोन्ही बहि‍णींमध्ये राजकीय मतभेद पण समोर आलेले दिसले. सोशल मीडियावर बबिता आणि तिच्या नवऱ्याने अप्रत्यक्षपणे विनेशवर निशाणा साधला होता. या दोघींमध्ये मतभेद असल्याचे यामुळे समोर आले आहे.

हरियाणात दादरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विनेश फोगाट उतरण्याची दाट शक्यता आहे. तर या विधानसभा मतदारसंघात बबिता फोगाट शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे कदाचित या दोन बहि‍णींमध्ये राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.