AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना पाहून विचलित होणाऱ्यांकडूनच हिजाबची सक्ती; भाजपच्या मंत्र्यांचं ट्विट

या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दहा दिवस सुनावणी झाली होती. या दहा दिवसात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची बाजूही ऐकून घेण्यात आली होती.

महिलांना पाहून विचलित होणाऱ्यांकडूनच हिजाबची सक्ती; भाजपच्या मंत्र्यांचं ट्विट
महिलांना पाहून विचलित होणाऱ्यांकडूनच हिजाबची सक्ती; भाजपच्या मंत्र्यांचं ट्विट Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 12:26 PM
Share

चंदीगड: कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर (Karnataka Hijab Row) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) तीन न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर काय निकाल येतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी एक ट्विट केलं आहे. पुरुषांनी मन कठोर करून महिलांना हिजाबपासून (Hijab Case) मुक्ती द्यावी, असं आवाहन अनिल विज यांनी केलं आहे. तसेच महिलांना पाहून ज्या पुरुषांचं मन विचलित होत होतं, त्यांनीच महिलांना हिजाबची सक्ती केली आहे, असा दावा अनिल विज यांनी केला आहे. विज यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

अनिल विज यांनी आपल्या या ट्विटमधून पुरुषांवर जोरदार टीका केली आहे. ज्या पुरुषांचं मन महिलांना पाहून विचलित होत होतं. त्यांनी महिलांना हिजाब परिधान करण्याची सक्ती केली. खरे तर पुरुषांनी आपल्या मनाला आवर घालण्याची गरज होती. पण त्यांनी शिक्षा महिलांना दिली. महिलांना डोक्यापासून पायापर्यंत अंग झाकायला भाग पाडलं. ही अन्याय आहे. पुरुषांनी आता मन कठोर करावं आणि महिलांना हिजाबमधून मुक्ती द्यावी, असं अनिल विज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यापूर्वीही विज यांनी हिजाबवरून विधान केलं होतं. हिजाबला विरोध नाही. मात्र, शाळा महाविद्यालयात गणवेशाबाबतच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. विद्यार्थीनी हिजाब परिधान करत असतील तर त्यावर आक्षेप नाही. मात्र, त्या शाळा-महाविद्यालयात जात असतील तर त्यांना शैक्षणिक संस्थांच्या गणवेशांचा नियम पाळलाच पाहिजे. जर त्यांना गणवेशांच्या नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी घरी राहावं. काहीच हरकत नाही, असं विज म्हणाले होते.

दरम्यान, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी असावी की असू नये या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायाधीशांचे एकमत झाले नाही. एक न्यायाधीश हिजाबबंदीच्या बाजूने होते. तर दुसरे न्यायाधीस विरोधात होते. त्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दहा दिवस सुनावणी झाली होती. या दहा दिवसात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची बाजूही ऐकून घेण्यात आली होती.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?