AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिजाब’वर न्यायाधीशांचे एकमत नाही, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं

या प्रकरणावर दोन्ही न्यायाधीशांची दोन वेगवेगळी मते असल्याने हे प्रकरम मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.

'हिजाब'वर न्यायाधीशांचे एकमत नाही, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलं
'हिजाब'वर न्यायाधीशांचे एकमत नाही, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवलंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली: कर्नाटक सरकारने  (Karnataka Hijab Row) शैक्षणिक संस्थात घातलेल्या हिजाब बंदीवर (Hijab Case) सर्वोच्च न्यायालयाच्या  (Supreme Court) दोन न्यायाधीशांचे एकमत झाले नाही. त्यामुळे या प्रकरणावर कोणताही फैसला देण्यात आला नाही. दोन्ही न्यायाधीशांचं एकमत न झाल्याने अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणावर तीन न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे.त्यामुळे तीन न्यायाधीशांचं खंडपीठ काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायाधीशांनी या प्रकरणावर दोन वेगवेगळे निर्णय दिले आहेत. जस्टिस सुधांशु धूलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तर हेमंत गुप्ता यांनी हिजाबवरील बॅनची याचिका रद्द केली. म्हणजेच गुप्ता यांनी हिजाबवरील बंदी योग्यच असल्याचं मानलं. या प्रकरणी 11 प्रश्न तयार करण्यात आले होते. त्याची मी उत्तरे दिली, असं जस्टिस हेमंत गुप्ता यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरून कर्नाटकात मोठा वाद झाला होता. त्यामुळे कर्नाटक सरकारने हिजाब घालण्यास बंदी घातली होती. त्यानंतर विद्यार्थीनींनी राज्य सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं. कर्नाटक उच्च न्यायालयाने मुलींची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे या विद्यार्थीनींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज सकाळी 10.30 वाजता या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी कोर्टाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात येत असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसाच्या सुनावणीनंतर 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. या दहा दिवसांच्या सुनावणीवेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांची युक्तिवाद ऐकला. तसेच कर्नाटक सरकार आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचा युक्तिवादही ऐकला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...