मोठी बातमी! भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट, केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून इशारा, दहशतवादी हल्ल्याच्या…

Airports on High Alert : मोठी खळबळ उडाली असून 4 ऑगस्ट रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने काही सूचना जारी केल्या आहेत. सुरक्षा यंत्रणेकडून मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. आता विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मोठी बातमी! भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट, केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून इशारा, दहशतवादी हल्ल्याच्या...
जर फोन फ्लाईट मोडवर नसेल तर कॉल आणि नोटिफिकेशनच्या आवाजाने प्रवाशांचे लक्ष विचलित होऊ शकते. टेक ऑफवेळी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतात, त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
| Updated on: Aug 06, 2025 | 9:33 AM

नुकताच भारतातील विमानातळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्व विमानतळांवर अलर्ट बघायला मिळतोय. दहशतवादी किंवा समाजविरोधी घटक यांच्याकडून संभाव्य धोका असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोकडून देण्यात आलीय. यामुळेच आता विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला. विमानतळावर सध्या कडक सुरक्षा ही बघायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीवर सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष आहे.

4 ऑगस्ट रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने कही सूचना जारी केल्या आहेत. ज्याच्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला. वाहतूक सुविधांवर बारीक लक्ष ठेवण्यात आलंय. ज्याठिकाणी सुरक्षा कमी आहे, तिथे तात्काळ वाढवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या. केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची संभावणा वर्तवण्यात आली. त्यानंतर ही पाऊले उचलण्यात आली आहेत.

सर्व सुरक्षा यंत्रणांना सूचना देण्यात आल्या की, 24 तास कडक सुरक्षा हवी आहे. काहीही झाले तरीही सुरक्षेत कोणत्याही प्रकारची हायगाई व्हायला नको. संवेदनशिल क्षेत्रामध्ये 24 तास गस्त घालण्याचे निर्देश देखील देण्यात आली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना देखील काही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विमानाची तपासणी आता कडक पद्धतीने केली जाणार आहे. सीसीटीव्ही प्रणाली पूर्णपणे कार्यरत असणार आहे. कर्मचाऱ्यांना देखील विमानतळ आवारात 24 तास आयकार्डशिवाय फिरता येणार नाही.

काहीही संशयास्पद वाटले की, लगेचच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर आता मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.या इशाऱ्यानंतर आता कडक पाऊले उचलण्यात आल्याचे बघायला मिळतंय. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. हिंदू लोकांना टार्गेट करून दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.