High Tempreture : राजधानीत उष्णतेची लाट, तापमान 46 अंश सेल्सिअस पार, सर्वाधिक तापमान कुठे? जाणून घ्या…

| Updated on: Jun 04, 2022 | 11:30 PM

पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहील आणि तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

High Tempreture :  राजधानीत उष्णतेची लाट, तापमान 46 अंश सेल्सिअस पार, सर्वाधिक तापमान कुठे? जाणून घ्या...
राजधानीत तापमानाचा कहर
Follow us on

दिल्ली : राजधानीत (Capital) पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेनं नागरिकांचे हाल होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही विविध भागात उष्णतेची लाट पसरल्यानं लोक घरात कैद झाले आहेत. त्याच वेळी, तापमानानं (Tempreture) 46 अंश सेल्सिअस पार केलंय. तर मुंगेशपूरमध्ये ते 47.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. त्यामुळे शनिवारी मुंगेशपूर हे दिल्लीतील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. एवढेच नाही तर जूनमध्ये तीन वर्षांच्या उष्णतेचा विक्रमही मोडला. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. ते सामान्यपेक्षा तीन अंश सेल्सिअस जास्त आहे. यामुळे 4 जून हा तीन वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला. यापूर्वी 2019 मध्ये दिल्लीचे कमाल तापमान 1 जूनला 44.8 अंश सेल्सिअस आणि 11 जून रोजी 45.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. सन 2019 नंतर या वर्षी जूनमध्ये (June) आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

उष्णतेच्या लाटेनं नागरिकांचे हाल

शनिवारी किमान तापमान 28.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. ते सामान्यपेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीतमपुरा आणि नजफगढमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं. या भागातील कमाल तापमान अनुक्रमे 46.9 °C, 46.5 °C आणि 46.2 °C इतके नोंदवलं गेलं.

हवामान खात्याने पिवळा इशारा दिल्यानुसार, रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर अनेक भागात उष्णतेची लाट राहील. त्यामुळे हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहील आणि तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्यामुळे सध्यातरी उष्णतेपासून फारसा दिलासा मिळणार नाही.