AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू

प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात झाला आहे. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून थेट दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू
| Updated on: Aug 08, 2026 | 1:35 PM
Share

हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरागढ मार्गावर आज शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे. या मार्गावरील चालुज वळणावर भरधाव बस उलटल्यानंतर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या बसमधील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. या बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी होते. जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बैरागगढहून चंबाच्या दिशेना जाणाऱ्या भरधाव बसचा हा भीषण अपघात झाला आहे.

तीसा-बैरागढ महामार्गावरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात बसचा चालक आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताविषयी अद्याप कोणतीही सविस्तर माहिती हाती आलेली नाही. अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. स्थानिक लोकांनी तातडीने जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.

वळणावर अपघात झाल्याची माहिती मिळताच काही वेळात पोलीस आणि प्रशासनाचं बचाव पथक देखील घटनास्थळी पोहोचलं. अपघात नेमका कसा झाला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस अधिकारी अनुभव शर्मा यांनी या अपघात आणि मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी सांगितलं की, आम्हाला दुर्घटनेविषयी माहिती मिळाली. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अकरा प्रवासी जखमी झाले. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघाताच्या सखोल तपासानंतर याविषयी माहिती समोर येईल.

मृतांची यादी समोर

जगदेव शर्मा, देस राज, तेजसिंग, जगदेई, त्यांची हरदेई, मोती सिंग यांच्या पत्नी नीलम, राधा राम यांचा मुलगा रूप सिंग यांचा मृत्यू झाला आहे.

जखमींचे नावे काय?

करणसिंग उर्प साहील, सुष्मिता, प्रियंका, हर्षू, पानो देवी, काव्या, धन्नी, धर्मोन देवी, अप्रित मंगल, नेहा, विजय कुमार. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असकल्याचे सांगण्यात आलं आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?