भयंकर अंधश्रद्धा, 15 वर्षाच्या आत्याने 9 वर्षांच्या भाचीचे तलवारीने उडवले शीर, घरात चार दिवसांपासून पूजा, अंगात आल्यानंतर कृत्य..

या काळात तिच्या अंगात देवी आल्याने तिने सांगितले आणि हातात तलवार घेून तिने घरात एकच गोंधळ घातला. यावेळी तिच्या आक्रळस्तेपणातून हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकदा अशा अंधश्रद्धा या मानसिक पातळीवर परिणाम करतात.

भयंकर अंधश्रद्धा, 15 वर्षाच्या आत्याने 9 वर्षांच्या भाचीचे तलवारीने उडवले शीर, घरात चार दिवसांपासून पूजा, अंगात आल्यानंतर कृत्य..
तलवारीने भाचीचे शीर उडवले Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 4:44 PM

डुंगरपूर, राजस्थान – सध्या आपण सगळे 21 व्या शतकात जगत असलो तरी अजूनही समजावारचा अंधश्रद्धेचा ( superstition)पगडा अद्याप गेलेला नाही. याचे एक भयंकर उदाहरण डुंगरपूरमध्ये(Dungarpur)समोर आले आहे. या अंधविश्वासातून एका अल्पवयीन आत्याने तिच्या सख्ख्या भाचीची (niece)निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 15 वर्षांच्या या अल्पयीन तरुणीने आपल्याच 9 वर्षांच्या भाचीचे शीर तलवारीने उडवून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. चार दिवसांपासून या अल्पयीन तरुणीला पूजेला बसवले होते. या काळात तिच्या अंगात देवी आल्याने तिने सांगितले आणि हातात तलवार घेून तिने घरात एकच गोंधळ घातला. यावेळी तिच्या आक्रळस्तेपणातून हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकदा अशा अंधश्रद्धा या मानसिक पातळीवर परिणाम करतात. त्यातून मनोरुग्णासारखी स्थिती निर्माण होते. त्यातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते आहे.

तलवार घेऊन धावली कुटुंबीयांवर

राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात झइंझवाफला या गावात हा प्रकार घडला आहे. रविवारी या ठिकाणी दशा माताची पूजा-अर्चना सुरु होती. या पूजेत १५ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीला चार दिवसांपासून बसवून ठेवले होते. या पूजेच्या काळात तिच्यात देवीचा संचार होत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ती तलवार उचलून घरातून बाहेर आली आणि अंगणात धावू लागली. सगळ्यांना मारुन टाकीन, असे ओरडण्यास या तरुणीने सुरुवात केली. या सगळ्या काळात त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्येही भीती पसरली. तरुणीचे हे रुप पाहून लोकांनी तिथून पळण्यास सुरुवात केली. तिच्या दोन भावांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिने या दोघांवरही तलवारीने वार केला. घाबरलेल्या भावांनी तिला त्याच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

सात वर्षांच्या मुलीचे घेतले प्राण

हा सगळा प्रकार घरात सुरु असताना, घरात या अल्पवयीन तरुणीच्या भावाची सात वर्षांची मुलगी घरात झोपलेली होती. आक्रळस्त झालेल्या तरुणीच्या नजरेला ही लहानगी दिसली. त्यानंतर या तरुणीने या लहानगीला फरफटत दुसऱ्या खोलीत नेले. तिथे तिने तलवारीने या लहानगीच्या मानेवर वार केला, तिचे शीरच या तरुणीने उडवले. ही लहानगी मेल्यानंतरही वेड्यासारखे ही तरुणी त्या लहानगीच्या अंगावर वार करीत राहिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. या अल्पवयीन तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता पुढील कारवाई करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.