दोन नद्यांच्या नावावरुन तयार झालेले ब्रह्मोस क्षेपणास्र किती घातक ? स्पीड, रेंज आणि ओरिजन कंट्री सर्व डिटेल्स वाचा

ब्रह्मोस क्षेपणास्राने पाकिस्तानच्या हवाई तळाचा सर्वनाश केल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. डीआरडीओने तयार केलेले हे सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल असून ते रशिया आणि भारत मैत्रीचे प्रतिक आहे.

दोन नद्यांच्या नावावरुन तयार झालेले ब्रह्मोस क्षेपणास्र किती घातक ? स्पीड, रेंज आणि ओरिजन कंट्री सर्व डिटेल्स वाचा
| Updated on: May 16, 2025 | 4:21 PM

‘ब्रह्मोस’ युद्धात गेम चेंजर ठरू शकते कारण ते जमीन, समुद्र, हवेतून आणि पाणबुडीतूनही डागता येते. या क्रुझ मिसाईलने भारताने पाकिस्तानची चांगलीच हवा टाईट करुन टाकली आहे. या ब्रह्मोस क्षेपणास्राला रशिया आणि भारत या दोन देशांनी एकत्र येऊन तयार केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस क्षेपणास्राचा वापर एअर स्ट्राईकमध्ये झाल्याची माहीती दिली आहे. शत्रुच्या हृदयात धडकी भरवणाऱ्या या क्षेपणास्राची काय आहेत वैशिष्ट्ये पाहूयात…

‘ब्रह्मोस’ मिसाईल हे सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल असून रशिया आणि भारत यांनी संयुक्तपणे या मिसाईलची निर्मिती केली आहे. हे मिसाईल जमीन, समुद्र, हवा, आणि पाणबुडीतूनही डागता येते. या क्षेपणास्राचा वेग ध्वनीच्या दुप्पट असून ५०० हून अधिक किलोमीटर याची रेंज आहे. हे क्षेपणास्र अचूक माऱ्यासाठी ओळखले जाते. भारताच्या भात्यातील हे प्रमुख अस्र आहे.

नद्यांवरुन नाव दिले

‘ब्रह्मोस’ मिसाईल हे पृथ्वीतलावरील सध्याच्या घडीचे सर्वात वेगवान क्रुझ मिसाईल आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि रशियाची NPO मशीनोस्ट्रोयेनिया यांनी हे क्षेपणास्र विकसित केलेले आहे. भारतातील ब्रह्मपुत्र आणि रशियातील मॉस्कोवा नदीच्या नावापासून त्याचे नाव पडले आहे.

‘डागा आणि विसरुन जा’

ब्रह्मोस क्षेपणास्राची दुसरी आवृत्तीचा वेग हा मॅक ८ असून त्याचा पल्ला १,५०० किमी आहे. हे नवीन ब्रह्मोस क्षेपणास्र स्टील्थ बनावटीचे असून ते रडारवरुन दिसत नाही. हे क्षेपणास्र ‘डागा आणि विसरुन जा’ अशा शैलीचे आहे. त्यामुळे ते लक्ष्य हलते असले तरी त्याचा माग घेत त्यावर हल्ला करते आणि लक्ष्यास उद्धवस्त करुन शांत होते.