AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुमताजसाठी ताहमहाल बांधणाऱ्या शाहजहानने किती लग्न केले होते? आकडा ऐकून बसेल धक्का

मुघल सम्राट जहांगीरचा मुलगा शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता, आजही ताजमहालाकडे प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं.

मुमताजसाठी ताहमहाल बांधणाऱ्या शाहजहानने किती लग्न केले होते? आकडा ऐकून बसेल धक्का
| Updated on: Jan 05, 2025 | 6:54 PM
Share

मुघल सम्राट जहांगीरचा मुलगा शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला असेल, पण त्याने एक-दोन नव्हे तर 14 जणींशी लग्न केले होते,मुमताजने 14 मुलांना जन्म दिल्याचे सांगितले जाते. शेवटच्या मुलाच्या वेळी तिला आग्रा ते मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर असा 787 किलोमीटरचा प्रवास करावा लागला.यामुळे तिला प्रचंड थकवा आला, आणि 1631 मध्ये तिचा मृत्यू झाला.

5 जानेवारी 1592 ला लाहोरमध्ये जन्मलेल्या शाहजहानची आणि मुमताजची प्रेमकथा इतिहासामध्ये आजरामर ठरली.मुमताज आणि आपलं प्रेम कायम जगाच्या लक्षात राहावं यासाठी तिच्या मृत्यूनंतर शाहजहाने तिच्या कबरीवर ताजमहालाची निर्मिती केली.ताजमहालाला आज देखील प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं.

ताजमहाल हे कॅरोलिन अर्नोल्ड आणि मॅडेलीन कोमुरा यांचं पुस्तक आहे. या पुस्तकाचा हवाला देत तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, मुमताजचं खरं नाव अर्जुमंद बानो असं होतं.तिचे आजोबा मिर्झा घियास बेग हे अकबराच्या काळात शाही दरबारात नोकरीला होते. मुमताजची मावशी मेहर -ऊन निसाने 1611 मध्ये अकबराशी विवाह केला, तिलाच नूरजहाँ या नावानं ओळखलं जातं.नूरजहाँला तिच्या कुटुंबानं उच्चशिक्षण दिलं होतं. नूरजहाँ ही मुमताजची मावशी होती.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार शाहजहानची आणि मुमताजची पहिली भेट ही नवरोजच्या उत्सवामध्ये झाली होती. नवरोज हा असा उत्सव होता, त्या दिवशी घरातील महिला या दुकानाची सजावट करत असत आणि दागिने, मसाले यासह इतर वस्तू विकत असत. यातून जो काही नफा व्हायचा त्यातून गरिबांची मदत केली जायची. या बाजारात शाहजहान पण आला होता. त्याने या बाजारात मुमताजला महागडे स्टोन आणि रेशीम विक्री करताना पाहिलं तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी तब्बल पाच वर्षांनी लग्न केलं. इतिहासकारांच्या मते मुमताज ही शाहजहानची सर्वात आवडती बेगम होती.  शाहजहानचं जेवढं प्रेम हे मुमताजवर होतं, तेवढं त्याचं इतर कुठल्याही रानीवर नव्हतं, म्हणूनच त्याने मुमताच्या आठवणीत ताजमहाल बांधला, आजही ताजमहालाकडे प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.