भारतासोबत युद्ध झालंच तर पाकिस्तान किती खर्च करू शकतो? बजेट ऐकूण येईल हसू

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भारतासोबत युद्ध झालंच तर पाकिस्तान किती खर्च करू शकतो? बजेट ऐकूण येईल हसू
| Updated on: May 04, 2025 | 6:42 PM

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे एलओसीवर सातत्यानं पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याला भारतीय सैनिकांकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे, भारत दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करेल असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. भारताच्या तीनही दलांना पूर्ण सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालच तर कोणत्या देश दारूगोळ्यावर किती खर्च करू शकतो याबाबत जाणून घेऊयात

1999 मध्ये कारगिल युद्धात कोणी किती खर्च केला?

पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी 1999 साली कारगिरलचं युद्ध झालं. हे युद्ध 56 दिवस सुरू होतं. ज्यामध्ये भारताचा मोठा विजय झाला होता. पाकिस्तानने शरणागती पत्कारली होती. या युद्धासाठी भारताने तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला, तर पाकिस्तानने खूप कमी खर्च केला होता.

समजा आता भारताचं पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर भारत या युद्धासाठी दररोज दोन हजार कोटी रुपये खर्च करू शकतो. तर पाकिस्तानची ताकत दररोज फक्त 300 ते 400 कोटी रुपये खर्च करण्याची इतकीच आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान भारतापुढे फार काठ टिकू शकणार नाही.

पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे.    पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळण्यात आल्या आहेत. सिंंधू नदीचं पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. तसेच आयात निर्यात देखील बंद करण्यात आली आहे.