AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींच्या घोटाळ्यात नाव आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?

अरविंद केजरीवाल यांना ईडीने आज अटक केली आहे. १०० कोटींच्या कथित दारु घोटाळ्यात त्यांचे नाव आले आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना ९ वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

100 कोटींच्या घोटाळ्यात नाव आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?
| Updated on: Mar 21, 2024 | 10:04 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आसी आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या अटकेपासून दिलासा देण्यात नकार दिला होता. आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी संध्याकाळी ईडीचे पथक  केजरीवाल यांना चौकशीसाठी पोहोचलं होतं. २ तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. याआधी ईडीने ९ वेळा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे एकूण 3.44 कोटींची संपत्ती आहे. केजरीवाल यांच्याकडे केवळ 12 हजार रुपये तर पत्नीकडे केवळ 9 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या कुटुंबाची 6 बँक खाती आहेत ज्यामध्ये 33.29 लाख रुपये जमा आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नावावर कोणतेही कर्ज नाही.

केजरीवाल यांच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे चांदी आणि 32 लाख रुपये किमतीचे सोने आहे. 2020 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रा त्यांनी ही माहिती दिली आहे. 15.31 लाख रुपये पत्नीच्या नावावर म्युच्युअल फंडात जमा आहेत. केजरीवाल यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. मात्र त्यांच्या पत्नीच्या नावावर 6.20 लाख रुपयांची मारुती बलेनो आहे.

एक कोटीचे आलिशान घर

हरियाणातील गुरुग्राममध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावावर एक आलिशान घर आहे. त्यांनी हे घर 2010 मध्ये खरेदी केले होते. 2020 मध्ये त्या घराची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यांनी हे घर 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. myneta.info नुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नावावर गाझियाबाद आणि हरियाणामध्ये बिगरशेती जमीन आहे, ज्याची किंमत 2020 नुसार 1.77 कोटी रुपये आहे.

केजरीवाल यांच्यावर कर्ज नाही

अरविंद केजरीवाल यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यांनी कोणतेही वैयक्तिक कर्ज घेतलेले नाही. LIC आणि NSC, पोस्टल बचत किंवा विमा यांसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये त्यांची गुंतवणूक नाही. त्यांच्या पत्नीच्या नावे पीपीएफ खात्यात १३ लाख रुपये जमा आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ५१ वर्षांचे आहेत. त्यांनीा 1989 साली IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी घेतली आहे. चांदणी चौक हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची पत्नी निवृत्त सरकारी कर्मचारी आहे.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात त्यांचे नाव पुढे आले आहे. ईडीने गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला पहिले समन्स पाठवले होते. 100 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह आणि के. कविता यांना अटक करण्यात आली आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.