8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगा संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. सरकारने सांगितले की सध्या कर्मचाऱ्यांच्या डीएला बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. मग प्रश्न हा आहे पगारात नक्की किती वाढ होणार आहे.

8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट
Updated on: Dec 01, 2025 | 7:48 PM

8th Pay Commission: केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्याला (DA) बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. ही अपडेट 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापन करण्याच्या प्रक्रीयेला नोटीफाय केले आहे. मग प्रश्न हा आहे की आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची सॅलरी किती वाढणार आहे ? चला पाहूयात..

किती वाढणार वेतन?

काही बातम्यानुसार 8 वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे एकूण बेसिक वेतन (Basic + DA) 14% ते 54%
वाढू शकते. तरीही 54% वाढ होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.एका बातमीनुसार सरकार या वाढीचा वापर खप वाढवण्याचे पाऊल म्हणून देखील करु शकते. संभाव्य वेतन वाढीच्या अंदाजे ग्रेड पे 1900, 2400, 4600, 7600 आणि 8900 साठी फिटमेंट फॅक्टर 1.92 आणि 2.57 मानून तयार केला आहे. यात HRA 24%, TA ₹3,600₹7,200, NPS 10% आणि CGHS शुल्क देखीस सामील आहे.

महागाई भत्ता आणि त्याचा अर्थ

महागाई भत्ता अर्थात डीए सरकारद्वार कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामापासून वाचवण्यासाठी दिला जात असतो. हा दर ऑल इंडिया कंझ्युमर प्राईल इंडेक्स (ACPI-IW) ( महागाई दर ) आधारे निश्चित केला जातो आणि दर सहा महिन्यांनी रिवाईज होत असतो. सध्या डीए 58% आहे. म्हणजे एक लाख रुपये बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 58,000 रुपये डीए मिळतो. डीएचा हेतू कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खऱ्या किंमतीला महागाईनुसार कायम ठेवणे आहे.

कर्मचाऱ्यांची मागणी आणि सरकारची स्थिती

डीएला बेसिक सॅलरीत मिक्स करा अशी मागणी अनेक कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून करत आहेत. जर असे झाले तर पुढच्या अलाऊन्स वाढीच्या वेळी बेसिक सॅलरीच्या प्रमाणात एकूण सॅलरी वाढेल. परंतू अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि महागाई भत्त्याला थेट बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही.

8 व्या सेंट्रल पे कमिशनचे भविष्य

सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापनेचे नोटीफिकेश 3 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केले आहे. या आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्याची बेसिक पे आणि अलाऊन्समध्ये बदल होणार आहे. डीएला बेसिकमध्ये मर्ज न करताही कर्मचाऱ्यांना पुढच्या पगार वाढीला याचा लाभ पाहतील. हे पाऊल कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळात एक फायदेशीर साधन ठरू शकते.