बिहारात भाजपाची रणनिती किती यशस्वी होणार ? एक्झिट पोलचे अंदाज काय ?
बिहारच्या निवडणूकीत एनडीएची रणनिती किती यशस्वी होणार, पुन्हा एकदा बिहारात नितीश कुमार यांचे सरकार येणार का ? का तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन कमाल दाखवणार ? काय म्हणत आहेत एक्झिट पोलचे अंदाज ?

सर्वांचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा २०२५ च्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर निवडणूकीचे एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरुवात झाली आहे. हे जाणणे महत्वाचे ठरणार आहे की यावेळी एनडीएची रणनिती किती यशस्वी होते. बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांचे सरकार होणार का ? की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन कमाल दाखवणार का ? शेवटी अंतिम निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतू मंगळवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाज बिहारमध्ये काय होणार याची चणूक दाखवत आहेत.
एनडीए आणि महागठबंधन, किती जागा ?
पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहार निवडणूकात एनडीए सर्वात मोठी आघाडी बनून समोर येऊ शकतो. एनडीएला १३३ ते १५९ जागा मिळण्याचा अंदाज या पिपल्स पल्सने वर्तवला आहे. तर महागठबंधनच्या खात्यात ७५ ते १०१ दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशांत किशोर याच्या जनसुराजच्या झोळीत ० ते ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना २ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पार्टीप्रमाणे जागांचा अंदाज
भाजपाच्या जागांचा विचार करता पिपल्स पल्स एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. भाजपाला ६३ ते ७० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला ६२ ते ६९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. एनडीएचा सहकारी नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूच्या खात्यात ५५ ते ६२ जागा येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
व्होट टक्केवारीत कोणाची बाजी ?
व्होट टक्केवारीचा विचार करता पिपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला ४६.२ टक्के मतदान, महागठबंधनला ३७.९ टक्के, जन सुराज्यला ९.७ टक्के व्होट मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आरजेडीला सर्वात जास्त २३.३ टक्के, भाजपाला २१.४ टक्के आणि जेडीयूला १७.६ टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.
बिहार निवडणूकाच्या पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी १२१ जागांवर रेकॉर्ड ब्रेक ६४.६९ टक्के मतदान झाले होते. तर तर १२२ जागांसाठीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानही रेकॉर्डब्रेक झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिहारमध्ये ६७.१४ टक्के मतदान झाले आहे. हा बिहारच्या इतिहासात आता पर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे.
मंगळवारी बिहारच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्ह्यातील १२२ विधान सभा जागांवर मतदान झाले. या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या अनेक मंत्री, प्रमुख विरोधी नेते आणि अपक्ष उमेदवारांची भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. दोन्ही टप्प्याचे मतदानाची मोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या वेळी निवडणूकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांचे महागठबंधन यांच्या थेट मुकाबला आहे. महागठबंधनच्या शिवाय निवडणूक रणनितीकार ते नेते बनलेले प्रशांत किशोर याच्या जनसुराज देखील एनडीएला टक्कर देण्याचा दावा करीत आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा AIMIM पक्ष देखील निवडणूकीत रंगत आणण्याचा दावा करीत आहे.
