तिसरं महायुद्ध सुरू झालं हे कसं कळणार? कोण करतं महायुद्धाची अधिकृत घोषणा?
जगभरात प्रचंड तणाव वाढला आहे, महत्त्वाचे देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर ते कसं कळणार? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये जगात प्रचंड तणाव वाढला आहे, एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष चांगलाच वाढला होता, मात्र आता युद्धविरामामुळे स्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यानंतर आता इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यात आला आहे. चीन आणि तैवानमध्येमध्ये देखील संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आहेत का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
जगभरात प्रचंड तणाव वाढला आहे, महत्त्वाचे देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर ते कसं कळणार? तिसरं महायुद्ध सुरू झालं आहे, अशी काही अधिकृत घोषणा होते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
तिसरं महायुद्ध सुरू झालं हे कसं कळणार?
जेव्हा एकाचवेळी जगातील शक्तिशाली देशांमध्ये युद्ध सुरू होईल, जसं की रशिया विरोधात नाटो देश, चीन विरोधात तैवान, इरान विरोधात इस्रायल तर ते तिसऱ्या महायुद्धाचे संकेत असू शकतात. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये देखील युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाची व्याप्ती त्या -त्या देशांपूर्तीच मर्यादीत असल्यामुळे याला महायुद्ध म्हणत नाहीत, मात्र जेव्हा जगभरातील अनेक देशांमध्ये एकाचवेळी युद्ध सुरू होईल, तेव्हा त्याला महायुद्ध असं म्हटलं जातं. महायुद्धाचे भीषण परिणाम जगाला भोगावले लागात. अन्न-धान्याची कमी, इंधनाचा तुटवडा, प्रचंड जीवितहानी, वित्तहानी, पायाभूत सुविधांनचं नुकसान असे अनेक परिणाम जगाला एकाच वेळी भोगावे लागतात.
महायुद्धाची घोषणा होते का?
कोणताही देश किंवा जागतिक संघटनेकडून महायुद्धाची घोषणा करण्यात येत नाही, किंवा कोणताही नेता यासंदर्भात घोषणा करत नाही. मात्र जेव्हा जगातील अनेक देश एकाचवेळी युद्ध सुरू करतात, अशा स्थितीमध्ये जगभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा महायुद्ध सुरू असल्याचं मानलं जातं.
