Cyclone Asani : आसानी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले: ओडिशा-बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; बिहार-झारखंडमध्येही अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी ओडिशातील पुरी-गंजामच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे वादळ धडकू शकते. वादळादरम्यान वाऱ्याचा वेग 125 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो, असेही आयएमडीने म्हटले आहे.

Cyclone Asani : आसानी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले: ओडिशा-बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; बिहार-झारखंडमध्येही अलर्ट
आसनी चक्रीवादळ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 3:07 PM

Cyclone Asani : आसानी चक्रीवादळ हे 2022 मधील उत्तर हिंद महासागर (Indian Ocean) क्षेत्रातील हे पहिले वादळ आहे. यामुळे ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ओडिशा राज्याला हाय अलर्ट देण्यात आला होता. मात्र आता बिहार आणि झारखंडमध्ये देकील अलर्ट देण्यात आला आहे. आसनी हे 2022 मधील पहिले चक्रीवादळ (Cyclone)असून त्याचा प्रभाव हा आजपासून म्हणजेच रविवारपासून दिसणार आहे. हे चक्रीवादळ शनिवारी अंदमान समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. यानंतर हवामान विभागाने (IMD) ओडिशा आणि बंगालमध्ये वादळाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी ओडिशातील पुरी-गंजामच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे वादळ धडकू शकते. वादळादरम्यान वाऱ्याचा वेग 125 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो, असेही आयएमडीने म्हटले आहे. येथे बिहार-झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

ओडिशातील 7.5 लाख लोकांना स्थलांतरित करण्याची तयारी

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, सरकारने समुद्रकिनाऱ्यांवर राहणाऱ्या सुमारे 7.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याची तयारी केली आहे. वादळाचा वेग वाढण्याचा धोका असल्यास लोकांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

वादळाची दिशा बदलू शकते: IMD

आयएमडी कोलकाता संचालक जीके दास यांनी म्हटले आहे की, वादळ सध्या बंगालच्या उपसागरात उच्च दाबाखाली आहे. येत्या काही तासांत वादळाची दिशाही बदलू शकते आणि ते ओडिशाच्या ऐवजी बंगालच्या कोणत्याही किनारपट्टीला धडकू शकते.

झारखंड-बिहारसह या राज्यांना याचा फटका

ओडिशा व्यतिरिक्त, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आसानी चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. हवामान खात्याने या राज्यांसाठी पावसाचा पिवळा अलर्टही जारी केला आहे.

2022 सालातील पहिले चक्रीवादळ

आसनी हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. यापूर्वी 2021 मध्ये 3 चक्री वादळे आली होती. जावाद चक्रीवादळ डिसेंबर २०२१ मध्ये आले होते. त्याच वेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.