AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS अधिकाऱ्याकडे मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधींची संपत्ती, कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीच्या जाळ्यात

IAS officer assets K. M. Abraham : आयएएस के.एम.अब्राहम याच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. केएम अब्राहम केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव आहेत. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे आरोप झाले आहे.

IAS अधिकाऱ्याकडे मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधींची संपत्ती, कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीच्या जाळ्यात
| Updated on: Apr 13, 2025 | 1:30 PM
Share

IAS officer assets : देशातील काही अधिकारी आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असतात. काही अधिकारी आपल्या संपत्तीमुळे चर्चेत येतात. बिहारमधील IAS अधिकारी संजीव हंस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी ईडीचा छापा पडला होता. त्या छाप्यानंतर आता केरळमधील एक आयएएस अधिकारी चर्चेत आला आहे. त्यांची मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधीची संपत्ती आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयएएस के.एम.अब्राहम याच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. केएम अब्राहम केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव आहेत. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे आरोप झाले आहे.

कोर्टाचे सीबीआयला आदेश

केरळ उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते जोमोन पुथेनपुराक्कल यांनी केएम अब्राहम यांच्या संपत्तीबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती के बाबू यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाने अब्राहम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले. सीबीआयचे कोच्ची युनिट या प्रकरणाचा तपास करणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षता ब्युरोचा तपासावर नाराजी

दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (VACB) कडून मागील तपासातील अपुरेपणा न्यायालयाने अधोरेखित केला. न्यायालयाने म्हटले आहे की, दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने केलेल्या तपासाची विश्वासार्हता संशयास्पद आहे. त्यांचा तपास जनतेमध्ये विश्वास निर्माण करु शकत नाही. व्हीएसीबीने अब्राहम यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांच्या अहवालातून दिसत आहे. जाणूनबुजून त्यांच्याकडून झालेल्या महत्त्वपूर्ण मालमत्ता अधिग्रहणांना वगळले होते.

 मुंबईत तीन कोटींचे अपार्टमेंट

याचिकाकर्ता जोमोन यांनी अब्राहम यांच्यावर आरोप केले आहे. 2000 ते 2015 दरम्यान त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचे म्हटले आहे. त्यात तीन संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मुंबईतील तीन कोटींचे अपार्टमेंट आहे. तिरुवनंतपुरममध्ये एक अपार्टमेंट आणि कोल्लम येथे आठ कोटी रुपयांचे तीन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.