AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी IAS पूजा सिंघल यांची डायरी आता होणार डीकोड, डायरीतून हायप्रोफाईल गुपितं बाहेर येणार

पूजा सिंघल यांच्या घरी टाकलेल्या धाडीत एक महत्त्वाची डायरी ईडी अधिकाऱ्यांचा हाती लागली आहे. या डायरीच्या आधारे अनेक हायप्रोफाईल नावेही या प्रकरणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. पैशांची अफरातफर करताना कुणाकुणाशी व्यवहार केले, तसेच अनेक राजकीय नेते, अधिकारी, पत्रकार यांची नावे आणि मोबाईल नंबर या डायरीत असल्याची माहिती आहे.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी IAS पूजा सिंघल यांची डायरी आता होणार डीकोड, डायरीतून हायप्रोफाईल गुपितं बाहेर येणार
IAS Pooja and moneyImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 08, 2022 | 8:11 PM
Share

रांची (Ranchi) – झारखंडमधील आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal)यांच्या बेहिशोबी मालमत्ता (money laundering) प्रकरणी आता आणखी काही जण ईडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा, सीए आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी टाकलेल्या छाप्यांत आत्तापर्यंत १९.३१ कोटींची रोख मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. पूजा सिंघल यांच्या घरी टाकलेल्या धाडीत एक महत्त्वाची डायरी ईडी अधिकाऱ्यांचा हाती लागली आहे. या डायरीच्या आधारे अनेक हायप्रोफाईल नावेही या प्रकरणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. पैशांची अफरातफर करताना कुणाकुणाशी व्यवहार केले, तसेच अनेक राजकीय नेते, अधिकारी, पत्रकार यांची नावे आणि मोबाईल नंबर या डायरीत असल्याची माहिती आहे. या डायरीत ज्यांची नावे आहेत, त्यांचीही आगामी काळात ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

१९.३१ कोटींची कॅश, १५० कोटींची मालमत्ता जप्त

पूजा सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांच्या घरी आणि इतर ठिकाणी केलेल्या छापेमारीत १९.३१ कोटींची कोख रक्कम आणि त्या व्यतिरिक्त १५० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. यासह २० नबावट कंपन्यांचे करारही सापडले आहेत, ज्य फक्त कागदोपत्री सुरु होत्या. यासह मनी लाँड्रिंगची माहिती असलेली डायरीही जप्त करण्यात आली आहे.

पूजा सिंघल यांच्या नीकटवर्तीयांच्या नावे अनेक कंपन्या

आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या नीकटवर्तीयांची नावे अनेक कंपन्यांच्या संचलाकपदांवर असल्याचेही ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या कंपन्यांच्या माधम्यातून काळा पैसा पांढरा केला जात होता. पूजा सिँघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या राहत्या पत्त्यावरच सुमारे डझनभर कंपन्यांची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांच्या संचालक पदांवर पूजा सिंघल यांचे नातेवाईक आणि नीकटवर्तीय असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पूजा सिंघल यांच्याशी संबंधित २५ हून अधिक ठिकाणी छापेमारी

आयएएस पूजा सिंघल याच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणांत ज्या ज्या ठिकाणी छापेमारी झाली, त्यात रांचीतील त्यांचे निवासस्थान, लालपूर, बरियातूतील पल्स हॉस्पिटल, सरकारी निवासस्थान, त्यांचे पती अभिषेक यांचे घर, सीए सुमनसिंह यांचे घर यांचा समावेश आहे. यासह राजस्थानात जयपूर, प. बंगालमध्ये कोलकाता, बिहारमध्ये मुज्जफरपूर, दिल्ली एनसीआर या ठिकाणांचा समावेश आहे.

<

Follow Us
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना