कोरोनाबाधितांची वारंवार RT-PCR टेस्ट नको, प्रवाशांसाठी गरज नाही, आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्स

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हैराण झाला आहे (ICMR issues advisory for corona testing).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:10 PM, 4 May 2021
कोरोनाबाधितांची वारंवार RT-PCR टेस्ट नको, प्रवाशांसाठी गरज नाही, आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्स
आयसीएमआरच्या टेस्टिंगबाबत नव्या गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हैराण झाला आहे. देशात दररोज 3 लाखापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हजारो रुग्णांचा दररोज मृत्यू होतोय. या संकट काळात आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. लाखो लोकांच्या दररोज आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. याशिवाय कोरोना विरोधाच्या लढाईत सक्षम व्हावं यासाठी लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे. या दरम्यान इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने टेस्टिंग संदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (ICMR issues advisory for corona testing).

‘प्रवाशांना आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही’

कोरोना काळात टेस्ट करणाऱ्या प्रयोगळशाळांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे हा ताण कमी करावा यासाठी आरसीएमआरने कोविड टेस्ट संदर्भात महत्त्वपूर्ण सूचान जारी केल्या आहेत. “आंतरराज्यीय प्रवास करताना आता प्रवाशांना आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. यातून प्रयोगशाळांवरील भार उलट कमी होईल. त्यातूनच कोरोना संक्रमणाला रोखता येईल”, असं आरसीएमआरने म्हटलं आहे (ICMR issues advisory for corona testing).

आरसीएमआरचे टेस्टिंग विषयी नेमक्या गाईडलाईन्स काय?

1) ज्या लोकांचा रिपोर्ट एकदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करु नये.

2) कोरोनापासून बरं झाल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

3) आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्यांसाठी आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याती आवश्यकता नाही.

‘देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 20 टक्के’

“देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 20 टक्के झाला आहे. या संकट विरोधात लढताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले पाहिजेत. तसेच मास्कचा वापर केला पाहिजे”, असं देखील आरसीएमआरने म्हटलं.