अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण

Ayodhya Ram temple | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून सुरु झालेला हा सोहळा २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठाने पूर्ण होणार आहे. या मंदिरातील मुख्य गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती आहे. माता जानकीची मूर्ती नाही. त्याचे कारण ट्रस्टने दिले आहे.

अयोध्या राम मंदिरातील गर्भगृहात फक्त रामाची मूर्ती, सीतेची का नाही ? ट्रस्टने दिले कारण
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 7:30 AM

अयोध्या, दि.17 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी प्रायश्चित्त पूजेने समारंभ सुरु झाला. आज मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीमुळे 20 आणि 21 जानेवारी रोजी रामलल्लाचे दर्शन बंद राहणार असल्याचे सांगितले. रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सर्व नद्यांचे जल आणण्यात आले आहे. सर्व जल कलश अयोध्येत पोहचले आहे. मंदिरातील गर्भगृहात ठेवण्यासाठी तीन मूर्ती तयार केल्या गेल्या. त्यातील कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांची मूर्तीची निवड करण्यात आली. परंतु ही मूर्ती फक्त भगवान श्रीरामाची आहे. त्यासोबत सीता माता किंवा लक्ष्मण नाही. त्याचे कारण ट्रस्टने दिले आहे.

सीता माता का नाही ?

भगवान श्रीरामाची मूर्ती ४ फूट ३ इंच आहे. काळ्या शिळेपासून ही मूर्ती तयार केली आहे. 150 ते 200 किलोग्रॅम मूर्तीचे वजन आहे. या मूर्तीसोबत सीता माता नाही. कारण पाच वर्षांचे रामलल्ला म्हणजे बालक रुपात रामलल्ला आहेत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, भगवान राम पाच वर्षांचे असल्यामुळे सोबत जानकी नाही. एकटे राम आहेत. परंतु वरच्या मजल्यावर राम आणि सीता असणार आहे. तीन भाऊ असणार आहेत. तसेच हनुमानजी असणार आहे.

सर्व आखाड्यांचे संत राहणार उपस्थित

श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्व आखाड्यांचे संत, सर्व संप्रदायचे आचार्य, संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महंत, महंत, नागा साधू, आदिवासी, गिरिवास तटवासी, द्वीपवासी जनजाती उपस्थित राहणार आहेत. शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, पत्य, सिख, बौद्ध, जैन, दशनाम शंक रामानंद्र, रामानुज, निंबार्क, मद्धव, विष्णु नामी, रामसनेही, घीसा पंथ, गरीबदासी, गौडीया, कबीरपं वाल्मीकी, आसममधील शंकरदेव, माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम – गायत्री परिवार, अनुकूलचंद, ठाकूर परंपरा, ओरीसामधील महिमा समाज, पंजाबमधील अकाली, निरंकारी, नाम राधास्वामी तथा स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.