रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरासाठी अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड झाली. योगीराज हे 37 वर्षांचे आहे. म्हैसूर महलमधील शिल्पकारांच्या परिवारातून ते येतात. वयाच्या अकराव्या वर्षांपासून ते मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत.

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 7:30 AM

अयोध्या, दि.16 जानेवारी 2024 | अयोध्येत आजपासून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाची मूर्ती तयार करण्यासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार तीन मूर्ती घडवत होते. त्यात मतदान प्रक्रियेनंतर कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांची मूर्तीची निवड करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी अरुण योगीराज यांचे कौतूक केले. योगीराज मूर्ती तयार होईपर्यंत बाहेरचे जगच विसरले. कुटुंबाशी बोलणे झाले नाही. मुलांशी आणि पत्नीशीही बोलले नाही. त्यांनी फोनलाही अनेक महिने हात लावला नाही. त्यांची मेहनत आणि एकाग्रतेमुळे खूप सुंदर रामलल्लाची मूर्ती तयार झाली आहे. दरम्यान, ट्रस्टने अजून या मूर्तीचे फोटो जारी केले नाही.

योगीराज यांचे त्या दिवसांचे जीवन वेगळेच

चंपत राय यांनी सांगितले की, अरुण योगीराज यांनी मूर्ती घडवण्याच्या कामामुळे काही महिन्यांपासून आपले जीवन जसे व्यतीत केले, त्याची कल्पनाही करु शकत नाही. मूर्तीचे काम सुरु असताना अनेक महिने त्यांनी फोनला स्पर्शही केला नाही. तसेच आपले मुले आणि परिवाराशी बोलत नव्हते.

कोण आहे अरुण योगीराज?

अरुण योगीराज 37 वर्षांचे आहे. म्हैसूर महलमधील शिल्पकारांच्या परिवारातून ते येतात. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केले आहे. त्याच्या परिवारातील ही पाचवी पिढी मूर्तीकार आहे. त्याचे वडील कुशल मूर्तीकार आहेत. त्यांनी गायत्री मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिरतील मूर्ती तयार केली आहे. दरम्यान मूर्ती तयार करताना योगीराज यांच्या डोळ्यात दगडाचा तुकडा गेला. शस्त्रक्रिया करुन तो काढला. त्यानंतर डोळ्यात वेदना होत असतानाही त्यांनी मूर्ती करण्याचे काम सुरुच ठेवले.

हे सुद्धा वाचा

नरेंद्र मोदी यांनी केले कौतूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगीराज यांच्या कौशल्याचे कौतूक केले आहे. इंडिया गेटवर उभारण्यात आलेली नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 30 फूट उंचीची मूर्ती अरुण त्यांनीच केली आहे. त्यांनी केदारनाथमधील आदी शंकराचार्य यांची मूर्ती तयार केली आहे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून ते मूर्ती घडवण्याचे काम करु लागले होते. 2006 मध्ये त्यांनी देवी दुर्गाची पहिली मूर्ती तयार केली. म्हैसूर स्टेशनवर अरुण योगराज यांच्या कलेची चांगली ओळख होते. या ठिकाणी त्यांच्या अनेक रचना आहेत.

हे ही वाचा…

जमीन विकली, उसनवारीने पैसे घेतले अन् राम मंदिरासाठी एक कोटी दिले, आता त्या व्यक्तीला…

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.