AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट… महाराष्ट्रासह 23 राज्यातील नागरिकांवर संकट, अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी

IMD Forecast July 9 : आयएमडीच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेशसह सुमारे 23 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... महाराष्ट्रासह 23 राज्यातील नागरिकांवर संकट, अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी
IMD Rain Alert for 23 statesImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 08, 2026 | 9:51 PM
Share

महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने उद्या म्हणजेच गुरुवार, 9 जुलैसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेशसह सुमारे 23 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असल्याने देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. या काळात जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जेनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या राज्यात पावसाची शक्यता?

विभागाच्या माहितीनुसार बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी, तर काही ठिकाणी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहू शकतात. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्यानंतर 13 जुलैपर्यंतही जोरदार पावसाचा अंदाज आहे. डोंगराळ भागात भूस्खलन, तर सखल भागात पाणी साचण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 9 ते 12 जुलैदरम्यान अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथेही 9 ते 12 जुलैदरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्लीत 9 जुलै रोजी ढगाळ वातावरण राहील आणि काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

पूर्व उत्तर प्रदेशात 9 जुलै रोजी काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात 9 जुलै रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात 9 आणि 10 जुलैदरम्यानही काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच झारखंडमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या राज्यांसाठी 12 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

ईशान्य भारतातील आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि गुजरातमध्येही काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. किनारी कर्नाटक, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक तसेच तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल येथेही मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात पुराचा इशारा

मुसळधार पावसामुळे 9 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत गुजरातमधील अनेक भागांत अकस्मात पुराचा धोका आहे. अरावली, दाहोद, महिसागर, पंचमहल तसेच राजस्थानातील डुंगरपूर, चित्तौडगड, उदयपूर, बांसवाडा आणि प्रतापगड या जिल्ह्यांसाठी फ्लॅश फ्लडचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय कोकण-गोवा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि जालना जिल्ह्यांनाही अकस्मात पुराचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट