AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस..! इथे पुन्हा बरसणार, इथे थांबणार..? ; हवामान खात्याने अंदाजाबरोबरच इशाराही दिला..

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाऊस..! इथे पुन्हा बरसणार, इथे थांबणार..? ; हवामान खात्याने अंदाजाबरोबरच इशाराही दिला..
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 03, 2023 | 11:49 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर हवामानातील बदलामुळे जिथे लोकांना ज्या ठिकाणी उष्णतेचा सामना करावा लागला नाही त्या ठिकाणी मात्र अतिवृष्टीसह झालेल्या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दिल्लीतील काही भागात आज संध्याकाळीही हलक्या सरीचा पाऊस झाला. आजच्या दिवसाबरोबरच हवामान खात्यानेही 4 एप्रिल रोजीही दिल्लीसह काही भागात हलक्या सरीचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे उर्वरित उत्तर भारतात हळूहळू हवामानात बदल होऊन आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभराच्या विश्रांतीनंतर राजधानी दिल्लीसह वेगवेगळ्या परिसरात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढग दाटून आले होते.

दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेच्या अनुमानानुसार दिल्लीत हलक्या सरीचा पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरातील किमान तापमान 16.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावले असून उद्याही हलक्या सरीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

दिल्लीसह हिमाचल प्रदेशातील काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीसह आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 तारखेनंतर पावसाचे प्रमाण कमी होणार असले तरी त्यानंतरही काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये 4 एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दिल्लीसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 5 दिवसांत काही भागात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाविषयी आयएमडीकडून सांगण्यात आले आहे की, एप्रिल ते जून या काळात भारतातील काही भाग वगळता बहुतांश भागात तापमान अधिक उष्ण राहणार आहे.

तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच