IMD Rain Alert : वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

Heavy Rain Warning : हवामान विभागाने शनिवारीही देशातील बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोणत्या राज्यात काय परिस्थिती असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.

IMD Rain Alert : वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
IMD India rain Alert
Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2026 | 10:36 PM

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनचा कहर पहायला मिळत आहे. आता हवामान विभागाने शनिवारीही देशातील बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तसेच हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीमसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम भारतातील गोवा, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात चांगला पाऊस पडू शकतो. तसेच केरळ, किनारी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशासाठी 4-5 दिवस धोक्याचे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. 8 ऑगस्ट रोजी पूर्व उत्तर प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 9 आणि 10 ऑगस्ट रोजी पूर्व व पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे तसेच नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजस्थानात 8 ते 10 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर वाढणार

राजस्थानमध्ये पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहणार असून अनेक भागांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 ते 10 ऑगस्टदरम्यान भरतपूर, जयपूर, कोटा, अजमेर आणि उदयपूर विभागातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढणार आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 आणि 9 ऑगस्ट रोजी कोटा आणि उदयपूर या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारादेण्यात आला आहे. पश्चिम राजस्थानातील जोधपूर आणि बिकानेर विभागातही या कालावधीत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्याच आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us