AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पलनी मंदिराच्या प्रसादात नपुंसकतेचे औषध, तामिळ दिग्दर्शकाचा दाव्याने खळबळ, पोलिसांनी केली कारवाई

मोहन यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या करियरची सुरुआत 2016 मध्ये आलेला चित्रपट'पलया वन्नरापेट्टै'ने केली होती. 2020 साल त्यांनी दिग्दर्शित केलेला 'द्रौपदी' हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. त्यामुळे ते नावारुपाला आले.

पलनी मंदिराच्या प्रसादात नपुंसकतेचे औषध, तामिळ दिग्दर्शकाचा दाव्याने खळबळ, पोलिसांनी केली कारवाई
| Updated on: Sep 24, 2024 | 7:14 PM
Share

एकीकडे तिरुपती मंदिराच्या लाडूत प्राण्याची चरबीचे तेल वापरल्याचा आरोपावरुन दक्षिणेसह जगभरातील श्रद्धाळूंना धक्का बसला आहे.तर दुसरीकडे तर दुसरीकडे साऊथचे दोन मोठे अभिनेते पवन कल्याण आणि प्रकाश राज यांच्यात लढाई सुरु आहे. तिरुपती मंदिराच्या प्रसादावरुन अनेक आरोपप्रत्यारोप राजकारण सुरु असतानाच तामिळनाडूच्या फिल्म इंडस्ट्रीतून आश्चर्यकारक बातमी आली आहे.प्रसिद्ध तामिळ चित्रपट दिग्दर्शक मोहन जी.यांनी प्रसिद्ध पलनी मंदिराच्या प्रसादात नपुंकसता निर्माण करणारे औषधे मिसळले जात असल्याचा धक्कादायक दावा केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. पलनी मंदिरातील पंचामृतम मध्ये पुरुषांना नंपुसक बनविणारे औषधे मिसळल्याचे दावा या दिदर्शकाने केला होता.

तिरुपती प्रकरणाचे वारे तामिळनाडूत

‘द्रौपदी’, ‘रूद्रतांडवम’ आणि ‘बकासुरन’सारख्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले मोहन जी यांना त्रिची पोलिसांच्या सायबर क्राईम यूनिटने मंगलवार अटक केली आहे. एका यूट्यूब चॅनलशी तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूत वारण्यात येणाऱ्या तुपासंदर्भात एक व्हिडीओत बोलताना मोहन यांनी अशा घटना तामिळनाडूत देखील घडल्याचा दावा केला.आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले की पलनी मंदिराच्या ‘पंचामृतम’ मध्ये औषधे मिसळे जात असल्याचा किस्सा सांगितला. कथित रुपाने मोहन यांना पंचामृतमवर अपमानास्पद टिपण्णी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

मोहन यांनी काय म्हटले होते ?

मी असे ऐकले आहे की पुरुषांमध्ये नपुंकसता येणारे औषध पंचामृतममध्ये मिसळले गेले होते. ही बातमी दडविण्यात आले. आणि त्यानंतर पंचामृतम नष्ट करण्यात आले होते. आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय बोलू नये परंतू या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण करण्यात आले नव्हते. तेथे काम करणाऱ्यांनी मला सांगितले की गर्भनिरोधक औषधांद्वारे हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी हिंदूंवरील हा हल्लाच होता.

मोहन यांच्या आरोपानंतर राजकारण सुरु

पलनी मंदिराच्या ‘पंचामृतम’बाबत फेक न्यूज पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे तामिलनाडु सरकारमधील एक मंत्री शेखर बाबू यांनी म्हटले आहे. चेन्नईचे बीजेपी अध्यक्ष अश्वथमन अल्लिमुतु यांनी मोहन यांना अटक करण्याच्या घटनेवर जोरदार टीका केली आहे.त्यांनी एक्सवर पोस्ट करीत मोहन यांना पाठींबा देत त्यांना कोणत्याही नोटिसी शिवाय अटक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मोहन यांच्या कुटुंबियांना न सांगताच त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे ? आणि त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकारमध्ये टीका करणाऱ्यांवर बेकायदेशीरपणे अटकेच्या कारवाई वाढ होत आहे अशी टीका अल्लिमुतु यांनी केली आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.