75 वर्षांत जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नाही, मोहन भागवतांचं मोठं विधान

| Updated on: Nov 21, 2021 | 9:13 PM

भागवत म्हणाले की, आपण भगवान जय श्रीरामचा नारा जोरात लावतो, पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. तो देव होता, असे आपल्याला वाटते. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतो, आपण करू शकत नाही, असा सामान्य माणसाचा विचार आहे. त्यामुळे ते त्या मार्गावर जाऊ शकत नाहीत.

75 वर्षांत जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नाही, मोहन भागवतांचं मोठं विधान
mohan bhagvat
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या 75 वर्षांत आपण जितकी प्रगती करायला हवी होती, तितकी प्रगती केलेली नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले. देशाला पुढे नेण्याच्या मार्गावर चाललात तर पुढे जाल, त्या मार्गावर चालणार नाही, तर पुढे जाऊ शकत नाही. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित संत ईश्वर सन्मान 2021 कार्यक्रमात संघ प्रमुख मोहन भागवत बोलत होते.

जगातील सर्वाधिक महापुरुष भारतात झाले

भागवत म्हणाले की, आपण भगवान जय श्रीरामचा नारा जोरात लावतो, पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. तो देव होता, असे आपल्याला वाटते. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतो, आपण करू शकत नाही, असा सामान्य माणसाचा विचार आहे. त्यामुळे ते त्या मार्गावर जाऊ शकत नाहीत. स्वार्थपणा सोडून जनतेच्या भल्यासाठी काम करणे अवघड आहे. जगातील सर्व देशांनी मिळून जेवढे महापुरुष आपल्या देशात गेल्या 200 वर्षांत घडले असतील, तेवढेच घडले आहेत, असेही ते म्हणाले. व्यक्तीचे जीवन सर्वांगीण जीवनाचा मार्ग प्रकट करते, असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी अधोरेखित केलंय.

समाजाची निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचाही गौरव

या कार्यक्रमात समाजाची निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. राष्ट्र सेवा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संत ईश्वर फाऊंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या नजरेपासून दूर राहून निस्वार्थीपणे समाजसेवेचे कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दरवर्षी संत ईश्वर सन्मान दिला जातो.

संबंधित बातम्या

Special Report: एसटीचं विलीनीकरण कशासाठी? फायदे-तोटे काय?; लालपरी पांढरा हत्ती ठरतोय?; वाचा, एसटीचं चाक रुतलं कुठं?

‘रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते,’ पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान