‘रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते,’ पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केले. विधानपरिषदेवर संधी न दिल्यामुळे त्या असे बोलल्या असा कयास बांधण्यात येतोय. पंकजा मुंडे यांच्या याच नाराजीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.

'रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते,' पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान
CHANDRAKANT PATIL AND PANKAJA MUNDE
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 6:31 PM

पुणे : फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केले. विधानपरिषदेवर संधी न दिल्यामुळे त्या असे बोलल्या असा कयास बांधण्यात येतोय. पंकजा मुंडे यांच्या याच नाराजीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. पंकजा मुंडेंबाबत चुकीचे अर्थ लावण्याचे कारण नाही. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षानंतर मिळालं. संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो. पंकजा आणि विनोदजींचही होईल या वर्षभरात. खूप स्कोप आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

पंकजा चांगल काम करतायेत, वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही

भाजप नेते विनोद तावडे आणि मी एकत्र काम केलंय. जेव्हा त्यांना तिकीट नाकारलं तेव्हा वेगळ्या चर्चा झाल्या. मात्र जे संयम ठेवतात रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते. पंकजा चांगल काम करतायेत. त्या प्रदेश कार्यकारीणीला उपस्थित होत्या. महाराष्ट्रातही त्यांचं लक्ष आहे. वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बावनकुळे यांना 2 वर्षानंतर संधी मिळाली, जबाबदारी महत्वाची 

तसेच पुढे बोलताना भाजप नेते चांद्रशेखर बावनकुळे यांना दोन वर्षानंतर संधी मिळाली. संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो. तावडेंची जबाबदारी खूप मोठी आहे. पंकजा आणि विनोदजींचही या वर्षभरात होईल. खूप स्कोप आहे, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

हात फैलावून पदाची मागणी करण्याची सवय नाहीये

दरम्यान, याआधी एका सभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाहीये. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

इतर बातम्या :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

शिवसेनेला पुन्हा धक्का, रत्नागिरीत राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांचा पक्ष प्रवेश

नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.