AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकांच्या अदलाबदलीचे विचित्र प्रकरण, वर आणि वधू दोघेही खूश, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एकमेकांच्या बायका पळवून घेऊन गेले, मुलांच्या सुध्दा वाटण्या केल्या, भन्नाट प्रेमाची सगळीकडं चर्चा

बायकांच्या अदलाबदलीचे विचित्र प्रकरण, वर आणि वधू दोघेही खूश, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
bihar news Image Credit source: Social Media
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 28, 2023 | 10:57 AM
Share

बिहार : आतापर्यंत तुम्ही लग्न अधिक बघितली असाल, बिहारमध्ये (Bihar) झालेल्या लग्नाची सगळीकडं चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ही दोन लग्नाची गोष्ट आहे. चर्चेचा विषय म्हणजे या दोन्ही विवाहांमध्ये एकाची पत्नी दुसऱ्याशी, तर दुसऱ्याची पत्नी पहिल्याशी विवाहित आहे. मिळालेली माहिती अशी आहे, एकाने दुसऱ्याच्या बायकोला पळवून नेलं होतं, त्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (bihar police) आहे. ज्यावेळी पळून गेलेली पत्नी मिळाली नाही. तेव्हा बायको पळून गेलेल्या व्यक्तीच्या बायकोशी त्याचे प्रेम संबंध जुळाले, तो त्याच्या पत्नीला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोघांनीही लग्न केलं. ही प्रेम कहाणी (bihar viral love story) जेव्हा लोकांना माहित झाली, तेव्हा मात्र चर्चा वाढली.

अशी केली मुलाची वाटणी

या सगळ्या प्रकरणात मुलांची वाटणी अधिक महत्त्वाची ठरली आहे. एकाला चार मुलं आहेत, तर दुसऱ्याला दोन मुलं आहे. दोघांचे मिळून एकूण ६ मुलं आहेत. आता दोघांनी तीन-तीन मुलं वाटून घेतली आहेत. त्यापैकी एकजण तीन मुलं पळून जाताना घेऊन गेला होता. त्याचबरोबर दुसरा त्याची दोन मुलं जाताना घेऊन गेला होता.

मुकेशला नीरजची पत्नी रुबीवरती प्रेम झालं

हे प्रकरण मागच्या वर्षीचं आहे. खगड़‍िया परिसरात हे प्रकरण घडलं असून पसराहा पोलिस स्टेशनला तक्रार झाल्यानंतर सगळीकडं या प्रकरणाची चर्चा झाली होती. मुकेशला नीरजची पत्नी रुबीवरती प्रेम झालं होतं. हे प्रेम प्रकरण अधिक दिवस चालू असल्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी मुकेश रुबीला घेऊन पळून गेला. त्याचबरोबर काही दिवसांनी त्याने तिच्यासोबत लग्न केलं.

नीरजने मुकेशच्या बायकोवरती प्रेम करायला सुरुवात केली

त्यानंतर नीरजने मुकेशच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. नीरजने बायकोला खूप शोध घेतला, परंतु बायकोचा शोध लागत नसल्यामुळे मुकेशने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानंतर नीरजने मुकेशच्या बायकोवरती प्रेम करायला सुरुवात केलं. दोघांची मन जुळल्यानंतर 18 फेब्रुवारीला नीरज मुकेशच्या पत्नीला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोघांनी एका मंदीरात लग्न केलं.

दोघांनी एकमेकांच्या बायकांसोबत लग्न केल्यामुळे दोघांची सगळी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर दोघंही आता सुखाने संसार करीत आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?